Headlines

Disha Salian Case : पाच वर्ष उलटून गेलीत, किती काळ तपास करणार? उच्च न्यायालयाकडून दिशा सालियान प्रकरणी मुंबई पोलिसांची खरडपट्टी

Disha Salian Case : पाच वर्ष उलटून गेलीत, किती काळ तपास करणार? उच्च न्यायालयाकडून दिशा सालियान प्रकरणी मुंबई पोलिसांची खरडपट्टी
Disha Salian Case : पाच वर्ष उलटून गेलीत, किती काळ तपास करणार? उच्च न्यायालयाकडून दिशा सालियान प्रकरणी मुंबई पोलिसांची खरडपट्टी



Disha Salian Case : दिशा सालियनच्या मृत्यूला (Disha Salian Death Case) पाच वर्ष उलटून गेलीत, आणखीन किती काळ तपास करणार? असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची विचारणा केली आहे. तसेच दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब तीन ते चार वेळा घेण्याची गरज का पडली? असा सवाल उपस्थित करत जबाबाची प्रत अद्याप त्यांना न दिल्याबद्दल दिशा सालियन मृत्यू (Disha Salian case) प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांचीही (Mumbai Police) खरडपट्टी काढली आहे.

Mumbai Police : जबाबाची प्रत अद्याप दिली नाही, मुंबई पोलिसांचीही खरडपट्टी

दरम्यान, दिशाचा मृत्यू अपघाती नसून तिच्यावर मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेत केला आहे.11 डिसेंबरच्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश सरकारी वकिलांना देत सुनावणी तहकूब केली. तर तपासाची प्राथमिक फेरी पूर्ण झाली असून दिशाच्या मृत्यू घातपात आढळाला नसल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची गरज नसून याचिका फेटाळण्याची विनंती मुंबई पोलिसांनी केली होती. तसेच प्राथमिक चौकशीचा अहवाल तयार असला तरी चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही, म्हणून अहवाल सादर केला नसल्याच मुंबई पोलिसांकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलंय.

Disha Salian Death Case : नेमकं प्रकरण काय?

दिशा सालियनच्या गूढ मृत्यूचे प्रकरण अतिशय गाजलेले आणि वादग्रस्त आहे. 2022 मध्ये महाराष्ट्र विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेचे (शिंदे गटाचे) आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली. या मुद्द्यावरून सभागृहात आमदारांमध्ये बराच गोंधळ झाला होता. या प्रकरणात, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही केली होती. दिशा सॅलियन एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंग राजपूत, भारती सिंग सारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. 

दरम्यान, दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *