Headlines

Diwali Bonus BEST Employees: बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी धनत्रयोदशीची पहाट खुशखबर घेऊन आली, दिवाळी बोनसचे 31 हजार बँक खात्यात जमा

Diwali Bonus BEST Employees: बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी धनत्रयोदशीची पहाट खुशखबर घेऊन आली, दिवाळी बोनसचे 31 हजार बँक खात्यात जमा
Diwali Bonus BEST Employees: बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी धनत्रयोदशीची पहाट खुशखबर घेऊन आली, दिवाळी बोनसचे 31 हजार बँक खात्यात जमा



Diwali Bonus BEST Employees: यंदाच्या दिवाळीतील धनत्रयोदशीची पहाट मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. वसुबारसच्या दिवशी म्हणजे काल बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी (Diwali 2025) 31 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदान (Diwali Bonus) देण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर दुसरा दिवस उजाडण्याच्या आधी दिवाळी बोनसचे हे पैसे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी ही बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी (BEST Employees) आनंदाची ठरली आहे. बेस्ट उपक्रमातील 23 हजार 596 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीचा बोनस मिळणार की नाही, याची चिंता लागून राहिली होती. परंतु, काल संध्याकाळी 31 हजार रुपयांचा बोनस मिळणार असल्याची घोषणा झाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. (Mumbai News)

तत्पूर्वी बेस्ट उपक्रमाच्या नवनियुक्त महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांनी बुधवारी बेस्ट वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि सानुग्रह अनुदानाबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी बेस्ट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दिवाळी भेटीइतकीच रक्कम बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर डॉ. सोनिया सेठी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार काल बेस्ट कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला होता. हे पैसे कालपासूनच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली होती. ऐन दिवाळीत घसघशीत बोनस मिळाल्याने सध्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपयांचा दिवाळी बोनस

राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना यंदा राज्य सरकारने दिवाळीसाठी सहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. त्याचसोबत कर्मचाऱ्यांना 12 हजारांची उचलही देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आपल्या मागण्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर संपाचं हत्यार उचलण्याचा निर्णय एसटी कर्मचारी संघटनांनी घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेऊन यावर यशस्वी तोडगा काढला होता.

इतर बातम्या:

PF खात्यातून आता 100 टक्के रक्कम काढता येणार; पैसे काढण्याची प्रोसेस काय, A टू Z माहिती

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *