Headlines

आपल्या बोलण्यामुळं दुसरा समाज नाराज होणार नाही याची खबरदारी घ्या, अजित पवारांच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांना सूचना  

आपल्या बोलण्यामुळं दुसरा समाज नाराज होणार नाही याची खबरदारी घ्या, अजित पवारांच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांना सूचना  
आपल्या बोलण्यामुळं दुसरा समाज नाराज होणार नाही याची खबरदारी घ्या, अजित पवारांच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांना सूचना  



Ajit Pawar :  आपल्या बोलण्यामुळे दुसरा समाज नाराज होणार नाही, ती खबरदारी घेतली पाहिजे, अस मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सातत्याने शिव शाहू फुले यांचे नाव घेतो त्यावेळी या कुठल्याही गोष्टी बसत नाहीत. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही हे आपण सांगतो तेव्हा कुठला समाज नाराज होणार नाही हे सुद्धा पाहिले पाहिजे असे अजित पवार म्हणाले. आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे. नोटीसला तो उत्तर तो देईल, ते आलं की पाहू असे अजित पवार म्हणाले. 

लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार

लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. दर मंगळवारी आमच्या आमदारांना सर्व नेत्यांना मंत्र्यांना बैठकीसाठी बोलवतो. पण मागे एकदा ठरवलं की महिन्याला एकदा सर्व जिल्ह्यांच्या अध्यक्षांना आणि कार्याध्यक्ष यांना बोलवायचं. त्या पद्धतीने आज बैठक घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुढे आपण कसं काम करायचं? अलीकडच्या काळात खूप मोठा बदल झाला आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पवार म्हणाले. पूरग्रस्त भागासाठी सरकारने मदत केली आहे, मात्र, ती मिळण्यापर्यंत लक्ष द्यावं, असा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचे अजित पवार म्हणाले. आज सुनील तटकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना लवकर जायचं होतं. बाकी सर्व नेत्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा कार्यक्रम झाला असे अजित पवार म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीबाबत बोलाता अजित पवार म्हणाले की, ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे प्रस्ताव मदत प्रदर्शन खात्याकडे आलेले आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हीसी मार्फत संपर्क साधला आहे.  पैशाची व्यवस्था करून ठेवली आहे. तिथे गरज लागेल तिथे तिला जाईल असे अजित पवार म्हणाले. 
एसटी संदर्भात सुद्धा बोनस द्यायचा होता तो सुद्धा निर्णय घेतल्याचे अजितपवार म्हणाले. 

महाराष्ट्रामध्ये नेहमीच निवडणुका पारदर्शक होत असतात

आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच निवडणुका पारदर्शक होत असतात. आरोप करणे आणि प्रत्यक्षात असणं हे वेगळं आहे. आरोपाला काहीतरी तथ्य असलं पाहिजे असे अजित पवार म्हणाले. जर कुणी लक्षात आणून दिलं तर त्याची चौकशी करणे गरजेचं आहे. त्याची ते चौकशी करतील शहानिशा करतील. त्याची शहानिशा झाली पाहिजे निवडणुका पूर्ण पारदर्शक झाल्या पाहिजेत असे अजित पवार म्हणाले. एका मतदाराचा एकीकडे नाव असेल तर तो दुसरीकडे मतदान करू शकणार नाही. पूर्वी आम्ही पाहायचो की शहरामध्ये सुद्धा मतदान करायचे आणि गावी सुद्धा मतदान करायचे. पण तो पूर्वीचा काळ होता असे अजित पवार म्हणाले. या यंत्रणेचा वापर सर्वांनी पारदर्शक केला पाहिजे. आरोपाचा भाग वेगळा. पण पुरावे द्यावेत.
हे निवडणूक आयोगाचे काम आहे असे अजित पवार म्हणाले. 

 लोकशाहीमध्ये विरोधकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार 

 प्रत्येकाला कोणाच्या बरोबर जाण्याचा अधिकार आहे. हे आपण स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना विचारावे. याचे उत्तर ते तुम्हाला समर्पकपणे देतील असे अजित पवार म्हणाले. लोकशाहीमध्ये विरोधकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्यांना उत्तर देईल असे अजित पवार म्हणाले. 

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *