Headlines

Eknath Shinde: पूरग्रस्तांसाठी घोषणा, उद्धव ठाकरेंना टोला, मोदींचं कौतुक; एकनाथ शिंदेंच्या भाषणातील 10 मुद्दे

Eknath Shinde: पूरग्रस्तांसाठी घोषणा, उद्धव ठाकरेंना टोला, मोदींचं कौतुक; एकनाथ शिंदेंच्या भाषणातील 10 मुद्दे
Eknath Shinde: पूरग्रस्तांसाठी घोषणा, उद्धव ठाकरेंना टोला, मोदींचं कौतुक; एकनाथ शिंदेंच्या भाषणातील 10 मुद्दे



मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Dasara melava) पुन्हा एकदा विचारांचे सोनं लुटण्याऐवजी एकमेकांवर टीकांची फटकेबाजी पाहायला मिळाली. यंदाच्या शिवसेना ( Shivsena) दसरा मेळाव्यावर अतिवृष्टी अन् पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनांचे सावट होते. त्यामुळे, दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घालण्यात आला. उद्धव ठाकरेंकडून हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची मागणी करण्यात आली. तर, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा एकनाथ शिंदेंचा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्या भाषणातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय, त्यासोबतच मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली-बाळींच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेना घेत असल्याचं त्यांनी जाहीर केला. तर, नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केल्याचंही पाहायला मिळालं. यासारखा रंग बदलणारा सरडा मी पाहिला नाही, असा टोला शिंदेनी उद्धव ठाकरेंना लगावला.

1. पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही

बळीराजाचं दु:ख मोठं आहे, त्याचं पशुधन वाहून गेलंय, जमीन खरडून गेलीय, घरांची पडझड झालीय. मी स्वत: बांधावर जाऊन बळीराजाचं दु:ख पाहिलं आहे. त्यामुळेच, बाळासाहेबांचा मुलमंत्र 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण आपण जपत आहोत. जिथं संकट, तिथं हा एकनाथ शिंदे धाऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूरग्रस्ताची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे.

2. लेना बँक म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका

कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी घेऊन दौऱ्याला जाणारा एकनाथ शिंदे नाही. फेसबुक लाईव्ह करणारा हा एकनाथ शिंदे नाही, असे म्हणत शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, हे कुठेही गेले तरी माझ्या हातात काही नाही म्हणतात, मग होतं तेव्हा तरी कुठं दिलं. द्यायलाही दानत लागते, ही लेना बँक नाही, देना बॅक आहे.

3. 30 वर्षांची माया कुठे गेली, लंडनला?

आम्ही किती तरी योजना दिल्या, आम्ही दोन्ही हाताने दिले, कधी म्हटलं नाही माझा हातात काही नाही. माझे दोन हात नाही तर समोर बसलेले या शिवसैनिकांचे हातही माझेच, हे व्यासपीठ हे शिवसैनिक ही माझी संपत्ती आहे. प्रॉपर्टीचा भुकेला मी नाही. बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती आहे. मगा, रामदास कदम म्हणाले 30 वर्षे पालिका लुबाडली, कुठे गेली माया? लंडनला असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.

4. मोदींनी बाळासाहेबांचं स्वप्न पर्ण केलं

मोदींनी 2014 नंतर सत्ता हाती घेतल्यावर घोटाळेबाज तुरूगांत गेले, एकही भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची हिंमत मोदींवर केली नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही पैसे आणायला दिल्लीत जातो, बाळासाहेबाचं स्वप्न कोणी पूर्ण केलं. राम मंदीर कोणी बांधलं, 370 कोणी काढलं, हे सर्व मोदींनी केलं. आज RSS वर टिका केली जे लोकं संकटात धावून जातात मदत करतात, 100 वर्षे झाली समर्पित भावनेनं काम करतात, त्यांवर टीका करता. कसले हिंदुत्ववादी तुम्ही, असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला. तसेच, मी 100 वर्षे पूर्ण केल्याबद्दल संघाला शुभेच्छा देतो, असेही म्हटले.

5. नाहीतर मुंबई 25 वर्षे मागे राहिल

लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. जर का आता जिंकलो नाही, तर मुंबई 25 वर्षे मागे राहिल, जी कामं केली ती लोकांपर्यंत पोहचवा. सगळीकडे महायुतीचा भगवा फडकला पाहिजे.

6. मुंबईवर महायुतीच भगवा फडकवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर नंबरवरुन टिका केली, तुम्ही घरात होता तेव्हा तुम्ही खालून वर होता. किती रंग बदलता, सरडाही एवढा पटकन रंग बदलत नाही. आपल्याला महायुतीचा भगवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फडकवायचा आहे. लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. कामाला लागा, असे आवाहन शिंदेंनी केले.

ठाकरे बंधूंच्या शिवसेना-मनसे युतीवरुन टोला

7. कोण कोणाशी युती करतो याची चिंता करू नका, त्या सर्वांचा हिशोब आमच्याकडे आहे. वर सर्व मंत्री बसलेत तुम्ही कार्यकर्ते आहात, मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम करतो तुम्ही एकनाथ शिंदेप्रमाणे काम करायचं आहे, असेही शिंदेनी म्हटलं.

8. पूरग्रस्तांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना घेणार

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात संकट आलंय, जे उद्ध्वस्त झालेत. त्यांच्या मुलीबाळींची लग्नं ठरली असतील, पुरामुळे त्याच्यावर बालंट आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न ठरली असतील त्याची जबाबदारी शिवसेना घेईल. माझ्याकडे दोन हात देणारे आहेत, रिकामे नाहीत.

9. मोदींनी पाकड्यांना धडा शिकवला

राज्यात याचं सरकार असतं तर काहीच सुरू झालं नसतं, हे स्थगिती सरकार होतं. मी मुख्यमंत्री झालो हे सर्व स्पीडब्रेकर उडवून टाकले. सर्व सण बंद होते, मंदिरं बंद होती, मी आलो आणि सर्व हटवलं. दुसऱ्या टप्यात आम्ही एकत्र येऊन आजही वेगाने काम करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या मागे उभे आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. पहलगाममध्ये आपल्या बहिणीचं कुंकू पुसण्याचं काम पाकड्यांनी केलं, त्यांना धडा शिकवण्याचं काम मोदींनी केले. खून का बदला खून, गोली का जवाब गोली से.. दिला. पी चिंदबरमं म्हणाले २६/११ ला दबाव होता, म्हणून हल्ला केला नाही, ही भारतीयांशी केलेली गद्दारी आहे. निष्पाप लोकं बळी पडले. मात्र, कुणाच्या तरी दबावाला बळी पडून उत्तर दिलं नाही, मोदीजी दबावाला बळी पडले नाहीत, आम्ही आणि पाकिस्तान बघू हे सांगणारे मोदी नाहीत, असे म्हणत मोदींचे कौतुकही शिंदेंनी केले.

10. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचे वर्षे

पुढचे वर्षे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे जन्मशताब्दी वर्षे आहे. त्यामुळे, शिवसेनेच्यावतीने यंदाचे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे.

हेही वाचा

Eknath Shinde: 30 वर्षांची माया कुठे गेली, लंडनला? फोटोग्राफर म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं, घणाघाती भाषण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *