मुख्य मालकाकडील नियमित कामगार/कर्मचारी करीत असलेल्या कामाचे स्वरूप व कंत्राटदाराने नियुक्त केलेले कंत्राटी कामगार करीत असलेल्या कामाचे स्वरूप हे एकच/सारखे असल्यास सदरहू कामासाठी कंत्राटी कामगारांना देण्यात येणारा पगार,रजा,सेवा शर्ती व इतर लाभ हे मुख्य मालकाकडील नियमित कामगारांना/कर्मचाऱ्याना देण्यात येणाऱ्या वेतना समान असावे.
यासाठी सुमारे 47 वर्षांपूर्वी संसदेत पारित झालेल्या कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम 1970 च्या केंद्रीय नियम 1971 च्या कलम 25(2)(v)(a) नुसार समान काम समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या संधर्भात केंद्रीय मुख्य कामगार आयुक्त यांनी परिपत्रक क्र.office memorandum दिनांक 13/09/2019 file No.49014/1/2017 // file No.W-02/0038/2019-DPE(WC)-GL-XVIII/19 आणि महाराष्ट्र शासन उधोग,उर्जा,कामगार विभागाने शासन परिपत्रक क्रमांक: सी एल ए-03/2014/प्र.क्र.95/कामगार-10 यामध्ये समान काम समान वेतन बाबतीत सर्व बाबीच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
जर तुम्हाला आमची पोस्ट समजली असेल तर तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद