Headlines

महाराष्ट्र कर्मचारी युनियनप्रणित रिक्षा चालक मालक संघाची स्थापना..

महाराष्ट्र कर्मचारी युनियनप्रणित रिक्षा चालक मालक संघाची स्थापना.. oplus_131074
महाराष्ट्र कर्मचारी युनियनप्रणित रिक्षा चालक मालक संघाची स्थापना..

नवी मुंबई : महाराष्ट्र कर्मचारी युनियनप्रणित रिक्षा चालक मालक संघाची गुरुवारी स्थापना करण्यात आली असून यावेळी कामगार नेते, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष तसेच नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत, महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, कंत्राटी कामगार युनिटचे अध्यक्ष संजय सुतार, युनियनचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव ,वामन रंगारी ,उपस्थित होते. महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही आंतराराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (आयटीएफ) शी संलग्न आहे.

नेरूळ सेक्टर २ येथील महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत या रिक्षा संघटनेची स्थापना करण्यात आली . या बैठकीत रिक्षा युनियनच्या अध्यक्षपदी विवेक सिताराम पवार, प्रदीप प्रभाकर मोहिते, विश्वास तुकाराम जाधव, लक्ष्मण साळुंके, साहेबराव तुकाराम जाधव यांची उपाध्यक्षपदी, महेश महिपती भोसले यांची सचिवपदी तर राजू कोंडीराम कदम यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या सदस्यपदी विनोद परशूराम मालुसरे, संदीप रघुनाथ बागले, राजेंद्र जाधव, उमेश बनसोडे, सुरेंद्र सहादेवराव पळसपदा, अनिल एकनाथ देशमुख, मारोती आनंदा लगट, गणेश भगवान शिंदे, विनोद गायकवाड, वामन रंगारी, उत्तम दास वैष्णव यांची सदस्यपदी निवड झाली.
यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी रिक्षा व्यवसायातील सध्याची अवस्था, समस्या, असुविधांचा आपल्या छोटेखानी मार्गदर्शनपर भाषणात आढावा घेऊन रिक्षाचालकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम करण्याची ग्वाही यावेळी दिली.

सध्या नवी मुंबईत अनेक रिक्षा युनियन कार्यरत आहेत. रिक्षा युनियन अनेक असणे चांगली गोष्ट आहे, पण या युनियन केवळ कागदावर असता कामा नये, त्याच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, त्यांना व्यवसायात कोणत्याही अडचणी येता कामा नये. परंतु रिक्षाचालकांना आजही समस्यांचा सामना करावा लागत आहे, हे संघटनांचे अपयश आहे. या युनियनच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या येत्या काळात समस्यांचे निवारण झालेले पहावयास मिळेल, असा आशावाद रविंद्र सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *