नवी मुंबई : कोपरखैरणे तीन टाकी येथे शुक्रवारी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या हस्ते महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात पार पाडले.
महाराष्ट्र कर्मचारी युनियनने नवी मुंबई महापालिकेत अधिकारी व सर्व कामगार यांना एकत्रित करून गेली नऊ वर्ष सातत्याने ठोक मानधन व कंत्राटी कामगारांच्या हितासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत कामगारांचे प्रश्न सातत्याने प्रशासनापुढे व अधिकाऱ्यांसमवेत मांडण्याचे काम केले आहे. लेखी निवेदनातून तसेच शिष्टमंडळासमवेत महापालिका ते मंत्रालयदरबारी सातत्याने पाठपुरावाही केला आहे. युनियनच्या माध्यमातून प्रशासनदरबारी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत. अनेक कामगारांना तसेच अधिकाऱ्यांना न्यायही युनिनयनने मिळवून दिलेला आहे. महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही कामगार संघटना ही मुंबई महापालिकेत सर्वात मोठी संघटना असून या संघटनेकडे सभासद संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा या संघटनेने सतत कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवल्यामुळे मोठ्या प्रमाणात महापालिकेतील कामगार येऊन सभासद होताना दिसत आहेत. कामगारांचे हित हेच संघटनेचे धोरण या उक्तीप्रमाणे कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कर्मचारी युनियन मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
यावेळी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, महापालिका कंत्राटी विभाग अध्यक्ष संजय सुतार,परिवहन विभाग अध्यक्ष नितीन गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन अध्यक्ष रविकुमार राठोड, कांतीलाल चांदणे, जितेश तांडेल,सुशांत लंबे,कंत्राटी कामगार विभागाचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव.
कोपरखैरणे विभाग कमिटीचे अध्यक्ष राजेश बंगेरा, उपाध्यक्ष नितीन बांगर, उपाध्यक्ष सुयेश मोरे, उपाध्यक्ष दुर्गेश कोळी, उपाध्यक्ष विशाल पाटील, सचिव संभाजी सोनकांबळे, सदस्य रवि दिवेकर, सचिन चिंचोलकर, गणेश गायकवाड, बादल म्हात्रे, राजेश भालेराव, महेश पाटील वामन डाऊरकर, विशाल मुकादम, जीवन खराटकर, दिनेश घरत, रोनित नाईक, रमेश जयपाल, दिलीप नाईक, दत्ताराम म्हात्रे, साईनाथ गायकवाड, प्रभुदयाळ खरात, चंद्रकांत सोनकांबळे, श्रीधर कांबळे, निलेश वातास यांच्यासह विविध विभागातील कर्मचारीचे संघटनेचे युनिट सभासद / पदाधिकारी तसेच पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, परिवहन विभाग, मलनिःसारण विभाग, घनकचरा विभाग,आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी सभासद/पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.