Headlines

Ganesh Utsav 2025: गणपतीच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डा खोदला तर 15 हजारांचा दंड होणार; मंगलप्रभात लोढांचा इशारा

Ganesh Utsav 2025: गणपतीच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डा खोदला तर 15 हजारांचा दंड होणार; मंगलप्रभात लोढांचा इशारा
Ganesh Utsav 2025: गणपतीच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डा खोदला तर 15 हजारांचा दंड होणार; मंगलप्रभात लोढांचा इशारा


Ganesh Utsav 2025 मुंबई : गणेशोत्सवाला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. अशातच जसजसा हा सण जवळ येतो तसतशी सार्वजनिक मंडळांची तयारीला जोरात वेग आला आहे. मात्र, मुंबईत यंदा मंडप उभारणीच्या कामात एक मोठा अडथळा समोर आला आहे, तो म्हणजे मुंबई महापालिकेचा (Mumbai Muncipal Corporation) नवा ‘दंड नियम’. गणेश मंडळांनी (Mumbai Ganesh Utsav 2025) रस्त्यावर जर मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावली नुसार 15 हजार रुपये दंड पालिकेकडून आकारण्यात येणार आहे. मात्र या पूर्वी हा दंड फक्त 2 हजार रुपये होता. म्हणजेच यंदा हा दंड तब्बल साडेसात पट वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही कारवाई ‘अन्यायकारक’ असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे या या निर्णयाचा विरोध लक्ष्यात घेता जुन्या नियमानुसारच दोन हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती मंत्री आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली.

महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन निर्णयावर पुन्हा विचार करू – मंगलप्रभात लोढा

दरम्यान या नव्या नियमानुसार खड्याला 15 हजार दंड आकारण्यात येणार असल्याने मुंबईतील मंडळामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. हि नाराही दूर करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार आहे. या संदर्भात महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन या निर्णयावर विचार करू, असेही आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. तसेच येत्या 10 दिवसात मुंबईतील आगमन आणि विसर्जन मार्गातील खड्डे बुजवले जातील, असं आश्वासन देखील त्यांनी दिलं.

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन एक खिडकी प्रणाली सुरू

सगळ्यांचा आवडता ‘श्रीगणेशोत्सव’ महाराष्ट्र शासनाने यावर्षापासून “महाराष्ट्राचा राज्य उत्सव” म्हणून घोषित केला आहे. मुंबईतील श्रीगणेशोत्सव उत्साहाने व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *