महाराष्ट्रातील 'या' समुद्र किनाऱ्यांवर मजा, मस्ती सर्वकाही;  New Year सेलिब्रेट करायला कशाला जायचं गोव्यात?

महाराष्ट्रातील 'या' समुद्र किनाऱ्यांवर मजा, मस्ती सर्वकाही; New Year सेलिब्रेट करायला कशाला जायचं गोव्यात?


Beautiful Beaches In Maharashtra For New Year Party :  थर्टी फस्ट आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण गोव्याला जातात. गोवा हा सुंदर समुद्र किनारे आणि नाईटसाठी प्रसिद्ध आहे. पण, तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रात देखील असेच गोव्याला टक्कर देतील असे सुंदर आणि अथांग समुद्र किनारे आहेत. महाराष्ट्रातील या समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या. 

महाराष्ट्राचा कोकण किनार पट्टा हा महाराष्ट्राची शान आहे. पर्यटनदृष्ट्या कोकण किनारपट्टा हा खूपच महत्वाचा आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक समुद्र किनारे आहेत. या पैकी अनेक समुद्र किनारे पर्यटकांपसाून अलिप्त आहेत. 
मालवण समुद्र किनारा हा कोकणातील सर्वात लोकप्रिय समुद्र किनारा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारा हा समुद्र किनारा वॉटर स्पोर्ट्ससाठी देखील प्रसिद्ध आहे. मालवण सह वेंगुर्ला, तारकर्ली हे देखील पर्यटकांचे आवडते समुद्र किनारे आहेत. कोकण रेल्वेने गेल्यास सावंतवाडी हे जवळचे स्टेशन आहे. 

गणपतीपुळे हा रत्नागिरी जिल्हयातील सर्वाधिक लोकप्रिय समुद्र किनारा आहे. गणपतीपुळे या प्रसिद्ध देवस्थानाच्या नावाने हा समुद्र किनारा ओळखला जातो. गणपती बाप्पाचे दर्शन घेवून मंदिराबाहेर पडल्यावर अथांग समुद्र किनारा नजरेस पडतो. लाखो पर्यटक गणपती पुळेला आवर्जून भेट देतात. 

गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावरच आरे वारे बीच आहे. हा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात स्वच्छ समुद्र किनारा म्हणूनही ओळखला जातो. गणपतीपुळे मार्गावरुन प्रवास करताना हा सुंदर समुद्र किनारा लक्ष वेधून घेतो. 

मांडवी आणि भाट्ये हे दोन समुद्र किनारे रत्नागिरी शहराच्य अगदी जवळ आहेत. मांडवी समुद्र किनाऱ्यावर रात्री उशीरा पर्यंत पर्यटकांची रेलचेल पहायला मिळते. तर, भाट्ये समुद्र किनारा देखील रात्रीच्या वेळेस पर्यटकांनी गजबजलेला असतो.   

अलिबागचा समुद्र किनारा हे मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे. अलिबागसह जवळपास अनेक समुद्र किनारे आहेत. येथे नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते.  शिरोडा, वेंगुर्ला, हर्णे, मुरुड, गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, आरेवारे, तारकर्ली, श्रीवर्धन, किहीम, वेळास असे कित्येक समुद्र किनारे आहेत. जिथे तुम्ही नक्की ट्रीप प्लान करु शकता. 





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *