Gold Investment : सामान्यांना सर्वात मोठा धक्का, या सोन्यात पैसे गुंतवल्यास द्यावा लागणार कर!

Gold Investment : सामान्यांना सर्वात मोठा धक्का, या सोन्यात पैसे गुंतवल्यास द्यावा लागणार कर!
Gold Investment : सामान्यांना सर्वात मोठा धक्का, या सोन्यात पैसे गुंतवल्यास द्यावा लागणार कर!


Tax ON Sovereign Gold Bond : केंद्र सरकारने 2026-27 सालाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला आहे. या बजेटमध्ये अनेक शेती, संरक्षण, लघु उद्योग तसेच इतर क्षेत्रांच्या वाढीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच अर्थसंकल्पातील काही तरतुदींमुळे बरेच नियम बदलणार आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आता केंद्र सरकारच्या एका योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर भरावा लागू शकतो. ही योजना नेमकी काय काय आहे? तसेच कर न भराव्या लागणाऱ्या इतर कोणत्या योजना आहेत, हे जाणून घेऊ या.

कोणत्या योजनेवर पैसे भरावे लागणार?

नव्या अर्थसंकल्पानुसार आता सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड अर्थात एसजीबीमध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स अर्थात भांडवली नफा कर भरावा लागू शकतो. यातही एक तरतूद विचारात घेणे गरजेचे आहे. तुम्ही सेकंडरी मार्केटमधून हे एसजीबी खरेदी केले तरत तुम्हाला हा कर भरावा लागेल. तुम्ही सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड जारी झाल्यानंतर लगेच खरेदी केले असतील आणि ते पूर्ण 8 वर्षे कायम ठेवले असतील तर तुम्हाला अशा एसजीबी खरेदीवर तुम्हाला कोणताही भांडवली नफा कर भरावा लागणार नाही. आरबीआयकडून खरेदी केलेले अशा प्रकारचे सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड हे करमुक्त असतील.

सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड म्हणजे नेमकं काय?

सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे. सोन्याचा दागिना, बिस्कीट, नाणे करण्यापेक्षा तुम्ही सॉव्हरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला सोनं साठवण्याची गरज नाही. अशा प्रकारच्या एसजीबीवर तुम्हाला 2.5 टक्क्यांनी व्याजही मिळते. वेळेच्या अगोदर तुम्ही सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड विकले तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागतो.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *