Headlines

पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ



मुंबई : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) (Mhada) पुणे, (pune) पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, पुणेकरांना किंवा पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आणखी एक संधी मिळाली आहे.          

पुण्यातील ४१८६ सदनिकांसाठी आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत दि. ११ डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता काढण्यात येणार आहे. दिनांक ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत. दिनांक ०१ डिसेंबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

तांत्रिक कारणामुळे अर्जदारांना अडचणी

काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अडचणी आल्याने व अनेक नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करणेसाठी तसेच इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ मिळण्याविषयी मागणी करण्यात आली. नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता शेवटची संधी म्हणून दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. इतर मजकुर पुर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे पुणे मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.             

पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत १६८३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २९९ सदनिका, १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील ८६४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३२२२ सदनिकांचा समावेश आहे.                                

हेही वाचा

डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *