Headlines

Goregaon Crime News : चोर समजून तरुणाचे हातपाय बांधत जमावाकडून बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू; घटनेनं गोरेगाव हादरलं

Goregaon Crime News : चोर समजून तरुणाचे हातपाय बांधत जमावाकडून बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू; घटनेनं गोरेगाव हादरलं
Goregaon Crime News : चोर समजून तरुणाचे हातपाय बांधत जमावाकडून बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू; घटनेनं गोरेगाव हादरलं



Goregaon Crime News : मुंबईच्या गोरेगावमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात जमावाच्या हल्ल्यामध्ये एका चोराचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झालाय. इमारतीचे काम सुरु असताना तेथील कामगारांनी या चोराला पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. हर्शल परमा असं या 26 वर्षीय तरुणाचे नाव असून या मारहाणीच्या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Goregaon Crime : कामगाराने मारहाण करत असताना फोटो काढला

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम परिसरात गोरेगाव पोलीस स्टेशनचे शेजारी राज बिल्डरकडून नवीन बांधकाम इमारतीचे काम सुरू आहे. याच इमारतीच्या तिसरा मजल्यावर इमारतीचे काम करणारे कामगार राहतात. या कामगारांचा परवा (19 ऑक्टोबर) रात्री एका मोबाईल चोरट्याने तिसरा मजल्यावर चढून मोबाईल चोराला. यानंतर इमारतीमध्ये काम करणारे पाच ते सहा कामगारांकडून या चोरट्याला बेदम मारहाण केली. यानंतर दोन कामगारांनी दोराच्या सहाय्याने या व्यक्तीला इमारतीच्या तिसरा मजल्यावर भिंतीला बांधून ठेवलं. तर दोन कामगारांनी बांधल्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. तर एक कामगाराने मारहाण करत असताना फोटो काढला. यानंतर बांधकाम इमारतीचं मॅनेजरला माहिती पडल्यानंतर त्यांनी पोलिसांना या संदर्भात तात्काळ माहिती दिली.

Goregaon Crime News : चौघांवर अटकेची कारवाई

दरम्यान, पोलिसांनी चोराला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला मृत घोषित केले. या मारहाणीत हर्शल परमा या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सलमान मोहम्मद खान, इसम्मुला खान, गौतम चमार, राजीव गुप्ता यांचावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघांवर अटकेची कारवाई करण्यातआली आहे. दरम्यान या प्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Satara Crime News : कराडला तीन पिस्टलसह तीन युवक ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई

सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन देशी बनावटीचे पिस्टलसह तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, एक ब्रीझा कार जप्त केलीय. या प्रकरणी तीन युवकांना ताब्यात घेतलं असून यात एका बड्या दारू व्यावसायिकाच्या मुलाचाही समावेश आहे. कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शामगाव घाटाजवळ करवडी येथे तीन देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तीन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व एक ब्रीझा कार जप्त करण्यात आली आहे. यामध्ये कराड शहरातील एका बड्या दारू व्यवसायिकाच्या मुलाचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. कार्तीक चंदवानी, ऋतेष माने, अक्षय सहजराव अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *