Headlines

मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही

मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही



अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच्या (NCP) प्रवक्ते पदावरील नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, या यादीत अगोदरच प्रवक्ते असलेल्या आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचं नाव झळकलं नाही, याशिवाय पुण्यातील महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचंही नाव दिसूनआल्याने या दोन्ही नेत्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा माध्यमांत रंगली आहे. या वृत्तानंतर अमोल मिटकरी यांनी प्रथमच माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी अजित दादांच्या विचाराचा प्रचारक आणि कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च आहे. अजित दादांचा (Ajit pawar) कार्यकर्ता असण्यासाठी नशिब लागतं, तितका नशिबवान मी आहे, असे मिटकरी यांनी म्हटलय.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ‘सोशल मीडियाहँडलवरीलबायो’मधूनप्रवक्ता’पदाचा उल्लेख हटवला आहे. पक्षाकडून काल प्रवक्ते पदावरील एकूण 17 नेत्यांच्या नावांची यादी जाहीर झाल्यानंतर मिटकरी यांनीएक्स’वरीलबायो’मधला ‘प्रवक्ता’ हा उल्लेख हटवला. अमोल मिटकरींच्याबायो’मध्ये आता फक्त ‘सदस्य, विधान परिषद सभागृह’ असा उल्लेख दिसून येत आहे. काल राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या यादीतून आमदार अमोल मिटकरींचं नाव हटवल्याचं दिसून आलं. नव्या प्रवक्त्यांच्या यादीमधून अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरेंना डच्चू मिळाला. त्यावर, आता मिटकरी यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली.

अजित दादांचा कार्यकर्ता हेच पद सर्वोच्च (Ajit pawar party worker)

अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादीच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून नावे गायब आहेत. याबाबत आमदार मिटकरींची प्रतिक्रिया समोर आली आहे. हकालपट्टी आणि उचलबांगडी शब्द माध्यमांनी चवीने लावल्याचं मिटकरींनी म्हटलं. याबाबत अधिकृत पत्र पक्षाकडून आलं नाही. आज अजित दादांच्या विचाराचा प्रचारक आणि कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे असलेले पद सर्वोच्च असल्याच मिटकरींनी म्हटले. तसेच, अजित दादांचा कार्यकर्ता असायला नशिब लागतं, तितका नशिबवान मी आहे, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली. यापूर्वी अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन आपल्या भावना एका कवितेच्या ओळीतून मांडल्या होत्या. या जगात संयम ठेऊन पुढे जाणाऱ्यांनाच ध्येय गाठता येतं, असे त्यांनी सूचवलं होतं. त्यानंतर, आज सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

मिटकरींनी ट्विटरवरुन मांडली होती भूमिका (amol Mitkari tweet)

अमोल मिटकरी यांनी शायरीतील दोन ओळीतून आपली भूमिका मांडली आहे. ट्विटरवरुन त्यांनी शायरी शेअर करत धावणारांच्या या जगात संयम ठेऊन पुढे जाणाऱ्यांनाच ध्येय गाठता येतं, असे मिटकरी यांनी सूचवलं आहे.

दुनिया दौडनेवालों की है

लेकिन मंजिले सब्र वालों को मिलती है !

हेही वाचा

परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *