Tejashwi Ghosalkar : आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी (Mumbai Municipal Corporation elections) आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejashwi Ghosalkar) यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वार्ड क्रमांक 1 मध्ये नागरिक प्रवर्ग म्हणजेच ओबीसी (OBC) आरक्षण घोषित झालं आहे. मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे ही निवडणूक लढवू शकत नाही, ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत दुःखद असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या ते पाहुयात.
मी निवडणूक लढवू शकत नाही यांचं दुःख
आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली. माझ्या वार्ड क्रमांक 1 मध्ये नागरिक प्रवर्ग म्हणजेच ओबीसी (OBC) आरक्षण घोषित झालं आहे. मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे ही निवडणूक लढवू शकत नाही, ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत दुःखद आहे. परंतु दुःख ह्याचे नाही की, मी निवडणूक लढवू शकत नाही, दुःख हे आहे की, मी आता माझ्या प्रभागातील तसेच दहिसर विधानसभा मतदारसंघातील सामान्य माणसाची सेवा प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून करु शकणार नाही.
माझ्या जनसेवेचा मार्ग थांबणार नाही
परंतु, या निर्णयामुळे माझ्या जनसेवेचा मार्ग थांबणार नाही. कारण अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या घोसाळकर कुटुंबीयांइतकीच साथ मला ह्या प्रभागातील तसेच दहिसर-बोरिवलीतील सगळ्या लोकांनी दिलेली आहे. म्हणूनच आज, उद्या आणि येणाऱ्या प्रत्येक काळात, माझ्या प्रभागातील, तसेच संपूर्ण दहिसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी, त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक किंवा सार्वजनिक अडचणींसाठी, मी नेहमीप्रमाणेच, अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहीन, ही माझी मनापासूनची खात्री आणि वचन असल्याचं घोसाळकर यांनी म्हटलं आहे.
आज मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली. सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतीचा आयोजन मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC Election 2025) बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा येथे या प्रक्रियेला सुरुवात झाली. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी ही सोडत काढण्यात आली. (BMC Election news in Marathi)
एकूण सदस्यसंख्या 227
महिलांसाठी राखीव 114
अनुसुचित जातींसाठी राखीव वॉर्ड- 15 महिला 8
अनुसुचित जमाती एकूण राखीव -2 महिला एक
ओबीसी राखीव 61 महिला 31
सर्वसाधारण वॉर्ड 149 महिला राखीव 74
महत्वाच्या बातम्या:
BMC Ward Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?
आणखी वाचा