
मुंबई : राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल केले आहे. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच ठेवला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र सुरुच आहे. आज पुन्हा राज्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठ झाली बदली?
1) अजीज शेख, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबई यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे इथ बदली करण्यात आली आहे.
2) अशीमा मित्तल या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक इथं कार्यरत होत्या. त्यांची नाशिकहून जालना जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
3) श्रीकृष्णनाथ पांचाळ जिल्हाधिकारी जालना यांची ठाणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4) विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई येथून अप्पर मुख्य सचिव महसूल मंत्रालय मुंबई या पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे.
5) अनिल डिग्गीकर अप्पर मुख्य सचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथून अप्पर मुख्य सचिव अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.
अशीमा मित्तल यांच्यावर मोठी जबाबदारी
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. मित्तल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली होणार अशी चर्चा होती. मात्र आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबवले होते. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे कामही त्यांच्याच कारकिर्दीत पूर्ण झाले असून इमारतीचे उदघाटन त्यांच्या कारकिर्दीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. नाशिकमध्ये सुपर 50, सी एस आर फंडातून बस, दिव्यांगासठी अनेक उपक्रम ग्रामीण भागात विविध योजना राबविल्या तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्य बदल्यांचे प्रकरण हेही त्यांच्याच कारकिर्दीत गाजले होते.
ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे उद्या निवृत्त होणार
ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे उद्या निवृत्त होत आहे. त्यांच्या जागी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्णनाथ पांचाळ या आधी जालन्याचे जिल्हाधिकारी होते.
महत्वाच्या बातम्या:
IAS Transfer : पराग सोमन वर्धा झेडपी CEO तर सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या नव्या आयुक्त, 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आणखी वाचा