Headlines

IND vs ENG, T20 Semi Final Live Streaming : इंडिया-इंग्लंड सेमी फायनलच्या वेळेत अचानक बदल? सामना किती वाजता?

IND vs ENG, T20 Semi Final Live Streaming : इंडिया-इंग्लंड सेमी फायनलच्या वेळेत अचानक बदल? सामना किती वाजता?
IND vs ENG, T20 Semi Final Live Streaming : इंडिया-इंग्लंड सेमी फायनलच्या वेळेत अचानक बदल? सामना किती वाजता?


आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने गतउपविजेत्या दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये रुबाबदार प्रवेश केला आहे. तर आता उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात यजमान टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी 2 हात करणार आहे. त्यामुळे गतविजेता टीम इंडिया पुन्हा एकदा आणि सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक देणार की इंग्लंड मैदान मारत अंतिम फेरीचं तिकीट मिळवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यानिमित्ताने उभयसंघातील सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना गुरुवारी 5 मार्चला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकवर लाईव्ह ब्लॉगद्वारे सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येतील.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

दोन्ही संघांची कामगिरी

दरम्यान इंग्लंडने साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले. तसेच इंग्लंड सुपर 8 फेरीत अजिंक्य राहिली. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने साखळी फेरीत अजिंक्य राहत विजयी चौकार लगावला. तर सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना गमावल्याने भारतासाठी करो या मरो अशी स्थिती झाली होती. मात्र भारताने सुपर 8 फेरीतील उर्वरित 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळला. आता गुरुवारी कोणता संघ अंतिम फेरीत धडक देतो याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *