
Ashwin on Usman Tariq : टीम इंडिया येत्या 15 फेब्रुवारीला T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. पण त्याआधी अश्विनने पाकिस्तानच्या वादग्रस्त गोलंदाजाबद्दल मोठं स्टेटमेंट केलं आहे. उस्मान तारिक या पाकिस्तानच्या उदयोन्मुख गोलंदाजांभोवती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलय. त्याच्या बॉलिंग Action बद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. अश्विनने तारिकच्या गोलंदाजी शैलीबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. अश्विनच्या मते उस्मान तारिकला टार्गेट करायचं असेल, तर सर्वप्रथम क्रिकेटचे नियम बदलावे लागतील.
उस्मान तारिकवरुन माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामीने प्रश्न उपस्थित केले होते. त्याला अश्विनने उत्तर दिलं. “फुटबॉलमध्ये सुद्धा पेनल्टी रनअप घेण्याआधी थांबण्याची आवश्यकता नसते. क्रिकेटमध्ये ही गोष्ट कशी योग्य ठरवली जाऊ शकते?. Action योग्य आहे पण थांबणं?. ते ही चेंडू हातातून टाकण्याआधी. सीरियसली हे क्रिकेटमध्ये चालू शकत नाही” असं श्रीवत्स गोस्वामीने आपल्या एक्स हँडलवर लिहिलय. श्रीवत्स गोस्वामीला पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकच्या गोलंदाजी Action वर आक्षेप नाहीय. पण गोलंदाजी दरम्यान चेंडू हातातून सोडण्याआधी तो जे थांबतो, ते मान्य नाहीय. पण अश्विनला ती अडचण वाटत नाही. अश्विनने श्रीवत्स गोस्वामीवर टीका करताना पाकिस्तानी स्पिनरला डिफेंड केलं.
प्रतिबंध नेहमी गोलंदाजांवरच का असतात?
अश्विनने श्रीवत्स गोस्वामीला आपल्या एक्स हँडलवरुन उत्तर दिलं. “मान्य आहे, फुटबॉलमध्ये थांबण्याची आवश्यकता नाही. पण कुठला फलंदाज अंपायर किंवा गोलंदाजाला सांगितल्याशिवाय स्विच हिट किंवा रिव्हर्स मारत असेल, तर ते योग्य आहे का?. त्याला माहित असतं, एक साइडनेच फलंदाजी करायची आहे. प्रतिबंध नेहमी गोलंदाजांवरच का असतात?. गोलंदाजाला अंपायरला सांगितल्याशिवाय आर्म बदलण्याची परवानगी का नसते? सर्वप्रथम त्यांनी क्रिकेटचे हे नियम बदलले पाहिजेत” असं अश्विनने म्हटलय.
Even football doesn’t allow players to pause during a penalty run-up anymore.
How is this ok? Action – all good. But pause ? That too while loading to deliver. This can’t be continued seriously ! #WorldCup2026 pic.twitter.com/gIgsjV7RlX— Shreevats goswami (@shreevats1) February 10, 2026
फलंदाजांसाठी मिस्ट्री बनला
उस्मान तारिक आपल्या नव्या आणि अनोख्या बॉलिंग Action मुळे फलंदाजांसाठी मिस्ट्री बनला आहे. पाकिस्तानसाठी तो आतापर्यंत 4 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. त्यात त्याने 11 विकेट काढलेत. करिअरमधील पाचवा सामना तो भारताविरुद्ध खेळणार आहे. स्पिन खेळण्यात माहीर असलेल्या भारतीय फलंदाजांसमोर तो कितपत यशस्वी ठरतो? ते लवकरच समजेल.