Headlines

IND vs PAK : चुकीच्या ठिकाणी U-turn घेतल्यावर…. दिल्ली पोलिसांकडूनही पाक जोरदार ट्रोल, पोस्ट टाकत बिनपाण्याने धुलाई

IND vs PAK :  चुकीच्या ठिकाणी U-turn घेतल्यावर…. दिल्ली पोलिसांकडूनही पाक जोरदार ट्रोल, पोस्ट टाकत बिनपाण्याने धुलाई
IND vs PAK :  चुकीच्या ठिकाणी U-turn घेतल्यावर…. दिल्ली पोलिसांकडूनही पाक जोरदार ट्रोल, पोस्ट टाकत बिनपाण्याने धुलाई


दिल्ली पोलिसांकडून पाकिस्तानी संघ ट्रोल

‘गजब बेइज्जती है…’ असंच दुखनं सध्या पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचं झालं आहे. भारताकडून टी-20 विश्वचषकात इतक्या वाईट पद्धतीने पराभव झाला की सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. यात आपले दिल्ली पोलिसही मागे नाहीत, त्यांनी तर जे काही पाकिस्तानच्या पराजयावर तोंडसुख कम खिल्ली उडवलीये, ती विचारायला नको.

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचं काही खरं नाही, असंच वातावरण सध्या तरी दिसतंय. श्रीलंकेत झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानं सध्या पाकिस्तानला मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागतंय. यावर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव असून दिल्ली पोलिसही यात मागे नाहीत. त्यांची एक रंजक पोस्ट चर्चेत आलीये. त्यांनी नेमकी काय पोस्ट केलीये, याविषयी पुढे वाचा.

श्रीलंकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला आणि पुन्हा एकदा धूळ चारली. या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव टाकला होता, ज्याचा परिणाम शेवटपर्यंत दिसून आला. पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या भारतीय संघाच्या विजयाने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. पण, दुसरीकडे पोलिस्तानवर मात्र मीम्सचा कहर आणि नामुष्कीला सामोरे जावे लागले.

आता दिल्ली पोलिसांनी केलेली पाकिस्तानवरील ती रंजक पोस्ट नेमकी काय आहे, पोकिस्तानची कशी फिरकी घेतली ते पहा..

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी टीमचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, यू-टर्न चुकीच्या ठिकाणाहून घ्यायला नको होता. दिल्ली पोलिसांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत 1 लाख 25 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत.

पाकिस्तानला तोंडात आपटण्याची सवय

‘क्वीन’ नावाच्या एका महिला युजरने कमेंटमध्ये नवाज शरीफ यांचा एक मजेदार फोटो शेअर केला आणि लिहिले की, आम्हाला (पाकिस्तानला) तोंडावर पडण्याची सवय आहे. अशीच एक युजर पूजा हिने कमेंटमध्ये लिहिले आहे की, दिल्ली पोलिस मजा घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. सुरेंद्र बिश्नोई नावाच्या एका युजरने पंचायत वेब सीरिजचा एक मीम शेअर केला आणि लिहिले की ‘गजब बेइज्जती हैं’.

भारत-पाकिस्तान सामन्याचे हायलाईट्स

  • भारताने सलामीवीर फलंदाज इशान किशन याच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर पाकिस्तासमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
  • भारताच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली.
  • भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 12 बॉलआधी ऑलआऊट केलं.
  • भारताने पाकिस्तानला 18 ओव्हरमध्ये 114 धावांवर गुंडाळलं.
  • भारताने या विजयासह वर्ल्ड कप मोहिमेतील आपला सलग तिसरा विजय मिळवला. तसेच भारताने यासह सुपर 8 फेरीत धडक दिली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *