Headlines

IPL 2026 : चाललंय काय? यलो आर्मीला तिसरा झटका, CSK मधून मॅचविनर आऊट

IPL 2026 : चाललंय काय? यलो आर्मीला तिसरा झटका, CSK मधून मॅचविनर आऊट
IPL 2026 : चाललंय काय? यलो आर्मीला तिसरा झटका, CSK मधून मॅचविनर आऊट


आयपीएल स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्स 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. सीएसके आपल्या मोहिमेतील पहिला सामना सोमवारी 30 मार्च रोजी खेळणार आहे. सीएसकेसमोर सलामीच्या सामन्यात पहिल्या मोसमातील उपविजेता राजस्थान रॉयल्सचं आव्हान असणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र चेन्नईला या सामन्याआधी तिसरा झटका लागला आहे.

वेगवान गोलंदाज नॅथन एलिस याला संपूर्ण मोसमातून बाहेर व्हावं लागलंय. महेंद्रसिंह धोनी याला दुखापतीमुळे 3 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे धोनीला किमान 6 सामन्यांना मुकावं लागणार आहे. त्यानंतर आता चेन्नईच्या युवा मॅचविनर खेळाडूला दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकावं लागल्याचं स्पष्ट झालं आहे. चेन्नईच्या दोघांना आधीच मुकावं लागलं आहे. त्यात तिसऱ्या भिडूची भर पडल्याने यलो आर्मीचं टेन्शन वाढलं आहे.

डेवाल्ड ब्रेव्हीस आऊट

बेबी एबी म्हणून ओळखला जाणारा युवा आणि विस्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीस याला दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळता येणार नसल्याचं सीएसके फ्रँचायजीने स्पष्ट केलं आहे. मात्र डेवाल्डला 3 सामन्यांना मुकावं लागू शकतं, असं म्हटलं जात आहे.

रेव्ह स्पोर्ट्सनुसार, डेवाल्डला साईड स्ट्रेनमुळे 2-3 सामन्यांमधून बाहेर रहावं लागणार आहे. आधीच महेंद्रसिंह धोनी नाही. त्यात आता डेवाल्ड नसल्याने सीएसकेची बॅटिंग आणखी कमकुवत होईल, असं म्हटलं जातंय.

डेवाल्डच्या जागी कुणाला संधी?

डेवाल्डच्या अनुपस्थितीत मॅथ्यू शॉर्ट याला संधी मिळू शकते. मॅथ्यूला संधी मिळाल्यास त्याचं पदार्पण होईल. त्यामुळे मॅथ्यूला संधी मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच सर्फराज खान याचाही डेवाल्डच्या जागी समावेश केला जाऊ शकतो.

डेवाल्डची 18 व्या मोसमातील कामगिरी

डेवाल्डला त्या क्षमतेनुसार 18 व्या मोसमात काही विशेष करता आलं नव्हतं. डेवाल्डने गेल्या हंगामात 6 सामन्यांमध्ये 225 धावा केल्या होत्या. डेवाल्डने या दरम्यान 2 अर्धशतकं लगावली होती. तसेच या युवा फलंदाजाने 17 षटकार लगावले होते.

डेवाल्ड पहिल्या सामन्यातून आऊट

सीएसकेने 18 व्या हंगामात किती सामने जिंकले?

दरम्यान चेन्नई सुपर किंग्सची 18 व्या हंगामात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात निराशाजनक कामगिरी राहिली होती. सीएसकेने 14 पैकी 10 सामने गमावले होते. तर चेन्नईला फक्त 4 सामनेच जिंकता आले होते. त्यामुळे सीएसके यंदा कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *