
IPL 2026 : प्लेऑफमध्ये हे चार जागा मिळवणार, माजी क्रिकेटपटूंनी ही नावं घेतली कॉमन Image Credit source: IPL Twitter
आयपीएल स्पर्धेला आता काही तासात सुरूवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी दहाही फ्रेंचायझींचे कर्णधार हे भारतीय आहेत. पॅट कमिन्स गैरहजेरीत इशान किशन सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा सांभाळणार आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी जेतेपदाची उत्सुकता ताणली गेली आहे. मागच्या पर्वात आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. असं असताना दिग्गज खेळाडूंनी कोणते चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार याचा अंदाज बांधला आहे. दिग्गज माजी खेळाडूंनी नावं जाहीर करताना काही नावं कॉमन आहेत. तर काही संघाच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे काही फ्रेंचायझी चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. पण स्पर्धेत चांगली कामगिरी कोणता संघ करणार यावर जेतेपदाचा मानकरी ठरेल.
- टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण म्हणाला की, या पर्वात मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवतील.
- माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या मते, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ जागा मिळवतील. एक संघाचा निर्णय त्याने क्रीडाप्रेमींवर सोडला आहे.
- दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फलंदाज फाफ डुप्लेसिसच्या मते, मुंबई इंडियन्स, आरसीबी, पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स/दिल्ली कॅपिटल्स हे संघ जागा मिळवतील.
- क्रिकेटचा जाणकार असलेल्या आकाश चोप्राने भाकीत वर्तवताना सांगितलं की, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि पंजाब किंग्स हे चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
- माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने चार संघ निवडताना एक नाव आश्चर्यकारक घेतलं आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ पात्र ठरू शकतात. त्याने गुजरात टायटन्सही रेसमध्ये असं सांगितलं.
- माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने प्लेऑफच्या चार संघांसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि आरसीबीला पसंती दिली आहे.
- माजी क्रिकेटपटू हनुमा विहारीने सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स टॉप चार संघ असतील असं सांगितलं आहे.
- माजी क्रिकेटपटू पियुष चावलाने मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, आरसीबी आणि पंजाब किंग्सला प्लेऑफसाठी पसंती दिली आहे.
- टीम इंडियचा माजी विकेटकीपर फलंदाज असलेल्सया बा करीमने मुंबई इंडियन्स, आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्सला पसंती दिली आहे.
- आयपीएल संघाचा माजी प्रशिक्षक असलेल्या संजय बांगरने मुंबई इंडिनय्स, आरसीबी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सला या शर्यतीत ठेवलं आहे.
- टीम इंडियाचा माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादला पसंती दिली आहे.
- माजी क्रिकेटपटू वरूण एरोनने भाकीत वर्तवताना सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्सला पसंती दिली आहे.
आयपीएल स्पर्धेसाठी प्लेऑफसाठी पसंती दिलेल्या संघांमध्ये एक नाव मात्र कॉमन आहे. ते म्हणजे मुंबई इंडियन्स.. तर पंजाब किंग्स, आरसीबी, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद ही नावं ही शर्यतीत आहे. तर गुजरात टायटन्स, केकेआर आणि राजस्थान रॉयल्सचं नाव एखाद दुसऱ्या क्रिकेटपटूने घेतलं आहे. पण यात लखनौ सुपर जायंट्सचं नाव कुठेच नाही.