
चार राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सावध पावलं उचलली आहे. सुरूवातीच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. पण हे वेळापत्रक पाहता मुंबई इंडियन्स चॅम्पियन्स होईल असा योग जुळून आला आहे. (Photo: PTI)
आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद भिडणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नऊ वर्षांपूर्वी 2017 मध्ये पहिला सामना आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात झाला होता. त्या वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावलं होतं. (Photo: PTI)
आयपीएल वेळापत्रकातील सर्वात मोठी बाब म्हणजे 18 वर्षानंतर बंगळुरूमध्ये पहिला आयपीएल सामना होणार आहे. यापूर्वी 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पहिला सामना झाला होता. (Photo: PTI)
आयपीएलच्या वेळापत्रकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सातव्यांदा त्यांचा सलामीचा सामना खेळणार आहे. तर सर्वाधिक सलामीचे सामने खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर आहे. या संघाने नऊ वेळा आयपीएल स्पर्धेचा पहिला सामना खेळला आहे. (Photo: PTI)
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सलग दोन पर्वात सलामीचा सामना खेळणार नाहीत. असं पहिल्यांदाच घडणार आहे. पहिला सामना 2025 मध्ये केकेआर आणि आरसीबी यांच्यात झाला होता आणि 2026 मध्ये आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होईल. (Photo: PTI)
आयपीएलमध्ये फक्त तीन संघ असे आहेत ज्यांनी हंगामातील पहिला सामना कधीही खेळलेला नाही. यात पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या तीन संघांचा समावेश आहे. (Photo: PTI)