Headlines

IPL 2026 : मुंबई सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज, पलटणची भक्कम बाजू कोणती? जाणून घ्या

IPL 2026 : मुंबई सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज, पलटणची भक्कम बाजू कोणती? जाणून घ्या
IPL 2026 : मुंबई सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज, पलटणची भक्कम बाजू कोणती? जाणून घ्या


मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिली सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. त्यानंतर चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद जिंकून मुंबईच्या या विक्रमाची बरोबरी केली. आता क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चाहत्यांना यंदा मुंबईकडून सहाव्या ट्रॉफीची आशा आहे. त्यामुळे पलटण कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांची करडी नजर असणार आहे. मुंबईच्या टीममध्ये कॅप्टन हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यासारखे टीम इंडियाचे खेळाडू आहेत. अनुभवी खेळाडू असल्याने मुंबईची ताकद सिद्ध होतेच. या निमित्ताने मुंबईची ताकद नक्की काय आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

पलटणमधील नवीन भिडू कोण?

पलटणनने आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी झालेल्या मिनी ऑक्शनमधून अनेक खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं. मुंबईला क्विंटन डी कॉक सारखा अनुभवी फलंदाज मिळाला. डी कॉक आधीही पलटणसाठी खेळलाय. तसेच मुंबईकर लोकल बॉय अर्थव अंकोलेकर अर्थात बंड्या याचाही समावेश करण्यात आलाय. तसेच मोहम्मद इजहार आणि मयंक रावत यांनाही ऑक्शनद्वारे घेतलंय. तर मंयक मारकंडे यांला ट्रेड विंडोद्वारे घेण्यात आलं आहे.

फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलूंची खाण

मुंबईत एकसेएक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये एकट्याच्या जोरावर सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे त्रिकुट ज्या पद्धतीने बॅटिंग करतात त्या हिशोबाने ते सामन्याचा निकाल ठरवु शकतात. रायन रिकेल्टन, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चाहर आणि जसप्रीत बुमराहसारखे धारदार बॉलर आहेत. मिचेल सँटनर आणि कर्णधार हार्दिक पंड्या असे 2 तगडे ऑलराउंडर आहेत.

मुंबईसमोर आव्हान काय?

दरम्यान मुंबईची गेल्या 5 वर्षांपासून ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईने शेवटची 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर मात्र पलटणला आयपीएल ट्रॉफी जवळ पोहचता आलं नाही. हार्दिक पंड्या याने मुंबईला त्याच्या नेतृत्वात गेल्या 2 हंगामात प्लेऑफपर्यंत पोहचवलं. मात्र त्यानंतर मुंबईचं पॅकअप झालं. त्यामुळे पलटण यंदा गेल्या 5 वर्षांची प्रतिक्षा संपवून सहावी ट्रॉफी आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरणार का? हे येत्या काही आठवड्यात स्पष्ट होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *