Headlines

IPL 2026 मोठी बातमी! मुंबई इंडियन्स हिसकावणार राजस्थानचा ‘कोहिनूर’? वैभव सूर्यवंशी संघ बदलणार?

IPL 2026  मोठी बातमी! मुंबई इंडियन्स हिसकावणार राजस्थानचा ‘कोहिनूर’? वैभव सूर्यवंशी संघ बदलणार?
IPL 2026  मोठी बातमी! मुंबई इंडियन्स हिसकावणार राजस्थानचा ‘कोहिनूर’? वैभव सूर्यवंशी संघ बदलणार?


वैभव सूर्यवंशीImage Credit source: टीव्ही ९ मराठी

Mumbai Indians- Rajasthan Royals : आयपीएलच्या 2025 मधील लिलावात राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला एक कोटी 10 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. तेव्हा तो अवघ्या 13 वर्षांचा होता. इतक्या कमी वयातील खेळाडूला मोठी संधी मिळाली. त्याची कामगिरी पाहता, आयपीएल 2026 मध्ये 13 व्या आणि राजस्थान रॉयल्सच्या तिसऱ्या सामन्यानंतर ही लिलावाची किंमत अत्यंत तोकडी वाटत आहे. आता वैभव सूर्यवंशी 15 वर्षांचा झाला आहे. त्याने याच वयात जगातील सर्वात घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्याच्या या अफाट कामगिरीने बुमराह सुद्धा अचंबित झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्सचा हा कोहिनूर ठापण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. वैभव सूर्यवंशीला मुंबई इंडियन्स संघात घेण्यासाठी मोठी तयारी सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

दमदार कामगिरीने सर्वच थक्क

जसप्रीत बुमराह याच्या पहिल्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशींने उत्तुंग षटकार हाणला. त्याने मुंबई इंडियन्सविरोधात 11 षटकांच्या सामन्यात 14 चेंडूवर 39 धावा केल्या. त्यात त्याने एक चौकार आणि 5 षटकार ठोकले. तीन तास पाऊस पडला. त्यानंतर सामना सुरू झाला. त्यात बुमराह याने गोलंदाजी केली. तर वैभव सूर्यवंशीने डोळ्याचे पारणे फेडले. त्याच्या दमदार खेळीने राजस्थान रॉयल्सने विजय अगोदरच निश्चित केला. मुंबई इंडियन्सला 123 धावांमध्ये गुंडाळले. 151 धावांचे लक्ष्य गाठताना मुंबई इंडियन्सचा जवळपास संपूर्ण संघ तंबूत परतला

वैभव तर त्याच्या भविष्यातील संघासोबत खेळला

राजस्थान रॉयल्सने वैभवला लिलावात कमी किंमत लावली असली तरी चिंता नाही. कारण पाच वेळा विजयाचा सेतू बांधणारी मुंबई इंडियन्स वैभवला त्यांच्या संघात घेऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबई इंडियन्स महागड्या खेळाडूंना अगोदर खरेदी करते. लवकरच सूर्यवंशी मुंबई इंडियन्सच्या खेम्यात दिसू शकतो. BCCI चे माजी निवडकर्ते जतिन परांजपे यांनी तर मोठे संकेत दिले आहे. वैभव सूर्यवंशी हा त्याच्या भविष्यातील संघासोबत खेळत असल्याचा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली.

वैभव केव्हा मुंबई इंडियन्सकडून खेळणार?

वैभव सूर्यवंशी मुंबई इंडियन्सकडून कधी खेळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यासाठी मात्र राजस्थान रॉयल्सची मनधरणी करावी लागणार आहे. आयपीएल हा साहसाचा आणि विचित्र घाडामोडींचा महाकुंभ आहे. इथे काहीही होऊ शकते. गुजरात टायटन्सकडून खेळल्यानंतर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने पुन्हा ताफ्यात घेतले. आताच्या हंगामात नाही, पण कदाचित वैभव सूर्यवंशी हा IPL 2027 मध्ये मुंबई इंडियन्स संघात दिसू शकेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *