
गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. दोन आठवड्यांसाठी युद्ध थांबणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर देशपातळीवरील अनेक हालचालांनी वेग आला आहे. यांपैकी एक म्हणजे इराणची होर्मूझ समुद्रधुनी लवकरच सुरु करण्यात येणार आहे. होर्मूझची समुद्रधुनी सुरु करण्यावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे.
दरम्यान सुत्रांच्या माहितीनुसार इराण इस्त्रायल अजूनही एकमेकांवर हल्ले करत असल्याचं दिसत आहे. युद्धविरामाची घोषणा ट्रम्पसह इराणनेही केली होती. मात्र घोषणेच्या 2 तासांनंतरही युद्ध काही थांबले नाही आता येत्या काळात नेमकं काय घडेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटद्वारे युद्धविरामाची माहिती दिली असून युद्धविरामानंतर ते इराणच्या 10 अटींबाबत चर्चा करणार असल्याचंही सांगितलं.