Headlines

Israel Iran War : इराणची इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत धडक, नेत्यानाहू यांच्या ऑफिसवर भीषण मिसाईल हल्ला

Israel Iran War : इराणची इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत धडक, नेत्यानाहू यांच्या ऑफिसवर भीषण मिसाईल हल्ला
Israel Iran War : इराणची इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत धडक, नेत्यानाहू यांच्या ऑफिसवर भीषण मिसाईल हल्ला


अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा तिसरा दिवस आहे. शनिवारी सकाळीच इस्रायलने एका पाठोपाठ अनेक हल्ले इराणवर केले आणि युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या युद्धामध्ये इराणचं तर मोठं नुकसान झालंच आहे. मात्र दुसरीकडे इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. इराणकडून इस्रायलच्या राजधानीवर देखील हल्ला करण्यात आला आहे. तसेच इराणने ज्या -ज्या देशात अमेरिकेचे सैन्य तळ आहे, त्या -त्या देशांवर देखील मिसाईल हल्ला केला आहे.

रविवारी इराणकडून मोठा दावा करण्यात आला होता, आम्ही अमेरिकेच्या अब्रहमलिंकन या युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा इराणने केला होता. आम्ही अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर चार मिसाईल डागल्या असा दावा इराणने केला होता, मात्र यावर अमेरिकेकडून अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिय समोर आलेली नाहीये. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे इस्रायचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर मिसाईल हल्ला केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. आम्ही नेत्यानाहू यांच्या कार्यालयाला लक्ष्य केलं आहे. आम्ही त्यांच्या कार्यालयावर मिसाईल हल्ला केला आहे. खैबर मिसाईलनं नेत्यानाहू यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे, असा दावा इराणकडून करण्यात आला आहे.  मात्र दुसरीकडे इस्रायलने हा दावा फेटाळून लावला आहे.   नेत्यानाहू यांचं भविष्य अनिश्चित आहे, असंही यावेळी इराणने म्हटलं आहे.

दरम्यान त्यापूर्वी अमेरिका आणि इस्रायलने रविवारी इराणवर भीषण हल्ले केले, या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आणखी चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये खामेनेई यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचा समावेश आहे.  या घटनेनंतर इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा फतवा काढण्यात आला आहे. दोन्ही बाजुंनी भीषण युद्ध सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *