Headlines

Isreal Iran War : तुमच्या भांडणात आम्हाला का घुसवलं..? या देशाचा थेट ट्रम्प यांच्यासमोर संताप; पत्रच…

Isreal Iran War : तुमच्या भांडणात आम्हाला का घुसवलं..? या देशाचा थेट ट्रम्प यांच्यासमोर संताप; पत्रच…
Isreal Iran War : तुमच्या भांडणात आम्हाला का घुसवलं..? या देशाचा थेट ट्रम्प यांच्यासमोर संताप; पत्रच…


अब्जाधीशाचे ट्रम्प यांना रोखठोक सवाल

अमेरिका- इस्रायल वि. इराण यांच्या युद्धामुळे मध्यपूर्वेत अक्षरश:विध्वंस सुरू असून त्यामुळे तणाव प्रचंड वाढला आहे. शनिवारी अमेरिका- इस्त्रायलने इराणवर हल्ले चढवले. त्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या इराणने चोख प्रत्युत्तर देत अमेरिका- इस्त्रायलवर हल्ला करत त्यांना नकोसं करून टाकलं. मात्र तीन देशांमध्ये सरू झालेलं हे युद्ध त्यांच्यापुरतंच मर्यादित राहिलं नसन त्याचा संपूर्ण जगाला फटका बसतोय. अनेक देश यात ओढले गेले आहेत. इराणने इस्रायलसह आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन सैन्य तळांना लक्ष्य केलं. सौदी अरेबिया, यूएई, ओमान, कतार, कुवेत यासारख्या देशातील अमेरिकेन तळांवर इराणने हल्ले चढवले असून युद्धाची झळ या देशांनाही बसली आहे.

या विध्वंसामुळे आखाती देशांना मोठा फटका बसला असून ते हादरले आहेत, तिथे प्रचंड तणाव आहे. याच दरम्यान UAEमधील टॉप उद्योजकांपैकी एक असलेले, अब्जाधीश उद्योगपती खलफ़ अहमद अल हब्तूर यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून जाब विचारला आहे. पत्राद्वारे त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या संघर्षाचा सर्वात जास्त परिणाम आखाती देशांवर होत आहे आणि त्यामुळे या प्रदेशात तणाव वाढत आहे, असं त्यांनी लिहीलं आहे.

युद्धात ओढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?

संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) एक आघाडीचे उद्योगपती खलाफ अहमद अल हबतूर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक खुले पत्र लिहून इराणशी युद्ध करण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीका केली आहे. “इराणसोबतच्या युद्धात आमच्या प्रदेशाला ओढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि तुम्ही हा धोकादायक निर्णय कोणत्या आधारावर घेतला?” असा रोखठोक सवाल अल हबतूर ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्षांनी विचारला आहे.

“(यामुळे) जे नुकसान होईल, त्याची तुम्ही ट्रिगर दाबण्यापूर्वी गणना केली होती का?. आणि या वाढत्या तणावामुळे प्रामुख्याने या प्रदेशातील देशांचे नुकसान होईल, त्यांना हानी पोहोचेल असं तुम्हाला वाटलं होतं का?” असा थेट सवाल हब्तूर यांनी केला.

ट्रंप यांना हब्तूर यांचे थेट सवाल

– हा तुमचा निर्णय होता की नेतान्याहूंनी दबाव टाकला होता?

– तुम्ही माघार घेण्यापूर्वी संपार्श्विक नुकसानाची गणना केली होती का?

– तुम्ही जीसीसी देशांना अशा धोक्यात आणले जे त्यांनी निवडले नव्हतं.

– तुमच्या “बोर्ड ऑफ़ पीस” उपक्रमाला आखाती देशांनी निधी दिला होता. आता आमच्यावर हल्ला होत आहे. ते पैसे कुठे गेले ?

– तुम्ही युद्ध न करण्याचे वचन दिले होते. पण, सोमालिया, इराक, येमेन, नायजेरिया, सीरिया, इराण आणि व्हेनेझुएला अशा सात देशांमध्ये तुम्ही ऑपरेशन्स केली आहेत.

– 400 दिवसांत तुमचा स्वीकारार्ह दर्जा ( अप्रूव्हल रेटिंग) 9 % ने घसरला आहे.

– तुम्ही अमेरिकन लोकांना शांततेचे वचन दिले होते. ते त्यांच्या करांमधून युद्धाला फंड देत ​​आहेत, अशी टीकाही उद्योगपती हब्तूर यांनी ट्रम्प यांच्यावर केली.

आखाती देशांना भोगावे लागतायत युद्धाचे परिणाम !

अमेरिकेच्या युद्धाचा फटका आखाती देशांना सहन करावा लागत आहे याबद्दल या प्रदेशात वाढती अस्वस्थता असल्याचे या पत्रातून दिसून येत आहे. ‘हा निर्णय तुमचा एकट्याचा होता का? की तो नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारच्या दबावामुळे आला?’ असं विचारण्याचा अधिकार या भागातील लोकांना आहे, असं हब्तूर पुढे म्हणाले.

“तुम्ही गल्फ कोऑपरेशन आणि अरब देशांना अशा धोक्याच्या मध्यभागी आणून ठेवलंय, मात्र या परिस्थितीची त्यांनी निवड केली नव्हती.  देवाचे आभार मानतो, की आम्ही स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहोत आणि आमच्याकडे आमच्या देशांचे रक्षण करणारे सैन्य आणि सुरक्षा दल आहेत. परंतु तरीही असा प्रश्न उपस्थित होतो की , आमचा हा प्रदेश युद्धभूमीत बदलण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?” असंही हब्तूर यांनी ट्रम्प यांना विचारलं.

” कारण शांतता आणि स्थिरतेच्या नावाखाली तुम्ही जाहीर केलेल्या बोर्ड ऑफ पीस उपक्रमावरची शाई सुकण्याआधीच, संपूर्ण प्रदेशाला धोका निर्माण करणाऱ्या लष्करी वाढीचा आम्हाला सामना करावा लागत आहे. मग ते उपक्रम कुठे गेले ? आणि शांततेच्या नावाखाली दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?” असाही जाब त्यांनी या पत्राद्वारे विचारला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *