Headlines

Jai Jawan Dahi handi 2025: जय जवानने 10 थरांची हॅटट्रिक मारली, राजकीय गांडुळांना माती दाखवली, मनसेच्या राजू पाटलांची सरनाईक पितापुत्रांवर टीका

Jai Jawan Dahi handi 2025: जय जवानने 10 थरांची हॅटट्रिक मारली, राजकीय गांडुळांना माती दाखवली, मनसेच्या राजू पाटलांची सरनाईक पितापुत्रांवर टीका
Jai Jawan Dahi handi 2025: जय जवानने 10 थरांची हॅटट्रिक मारली, राजकीय गांडुळांना माती दाखवली, मनसेच्या राजू पाटलांची सरनाईक पितापुत्रांवर टीका


Jai Jawan Dahi handi 2025: मुंबईतील दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देणाऱ्या आणि या उत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाने (Jai Jawan Govinda Pathak) शनिवारी तीनवेळा 10 थर रचून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. जय जवान गोविंदा पथक हे मुंबईतील जुन्या आणि प्रतिष्ठित गोविंदा पथकांपैकी एक आहे. त्यामुळे या गोविंदा पथकाला दहीहंडी उत्सवात मानाचे स्थान असते. मात्र, यंदा ठाकरे बंधू (Thackeray Brothers) यांच्या वरळी येथील मराठी मेळाव्यात सलामी दिल्यामुळे प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या प्रो-गोविंदा स्पर्धेतून जय जवानला जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप झाला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठाकडून ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला. शनिवारी सकाळी सरनाईकांच्या दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचून विश्वविक्रम प्रस्थापित केला. यानंतर प्रताप सरनाईक यांनी जय जवान गोविंदा पथकाला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. परंतु, जय जवान मंडळाने काल संध्याकाळी सरनाईकांच्या दहीहंडी उत्सवात येऊन त्याच जागेवर 10 थर रचून दाखवले. यानंतर मनसेचे नेते राजू पाटील (Raj Patil) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सरनाईक पितापुत्रांना सुनावले.

मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहीहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा नीच राजकारण केले होते. आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकाने ‘त्यांच्या’ इथे पहिल्यांदा १० थर लावले, त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला. आज त्याच जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा १० थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडूळांना माती दाखवली. जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे ?, असे राजू पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक जय जवान गोविंदा पथकाला नेमकं काय म्हणाले?

कोणी काहीही म्हणू द्या, कोणाचीही युती होऊ द्या. काही गोविंदा पथकांना वाटत असतं की, आमचा विश्वविक्रम मोडणार नाही. आम्ही सार्वभौम आहोत. पण कोकण नगर गोविंदा पथकाने दाखवलं की, विश्वविक्रम ही कोणा एकाची मक्तेदारी नसते. विश्वविक्रम हे मोडण्यासाठीच असतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख जय जवान गोविंदा पथकाच्या दिशेने होता. जय जवान पथकानेही नऊ थरांचा विक्रम आपल्याच संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत रचला होता, असेही प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले होते.

आणखी वाचा

जय जवाननं दाखवून दिलं गोविंदा पथकांचे राजे आम्हीच! कोकण नगर मंडळानंतर रचले 10 थर

विश्वविक्रमी 10 थर, कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला!

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *