Headlines

Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025: ठाकरे बंधूंना सलामी देणं जय जवानला नडलं?; जय जवान प्रो गोविंदातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025: ठाकरे बंधूंना सलामी देणं जय जवानला नडलं?; जय जवान प्रो गोविंदातून बाहेर; नेमकं काय घडलं?
Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025: ठाकरे बंधूंना सलामी देणं जय जवानला नडलं?; जय जवान प्रो गोविंदातून बाहेर; नेमकं काय घडलं?


Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025: प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या प्रो-गोविंदा स्पर्धेत (Pro Govinda 2025) जय जवान गोविंदा पथकाला (Jai Jawan Govinda Pathak) संधी देण्यात आली नसल्याने जय जवान पथकानं नाराजी व्यक्त केलीय. आयोजकांनी राजकारण करुन आम्हाला बाहेर काढल्याचा जय जवान पथकानं आरोप केला आहे. तर 10 जून रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस होता.  जय जवान पथकाला रजिस्ट्रेशन करण्यास उशीर झाल्याने संधी दिली नसल्याचे आयोजकांनी स्पष्टीकरण दिलंय. 

प्रो-गोविंदा स्पर्धेच्या आयोजनकांनी राजकारण करुन डावलल्याचा आरोप जय जवान गोविंदा पथकाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, याच जय जवान गोविंदा पथकाने मुंबईत झालेल्या ठाकरेंच्या विजयी मिळाव्यात थर लावून सलामी दिली होती. त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सलामी देणं नडलं की काय, अशी चर्चा सध्या मुंबई आणि उपनगरातील गोविंदा पथक मंडळांमध्ये रंगली आहे. दरम्यान, 7,8 आणि 9 ऑगस्ट रोजी वरळीमधील डोम येथे प्रो गोविंदाची स्पर्धा रंगणार आहे.

जय जवान गोविंदा पथकाचे व्यवस्थापक विजय निकम काय म्हणाले?

जय जवान गोविंदा पथकाने प्रो गोविंदामध्ये भाग घेण्यासाठी 12 वाजून 4 मिनिटांनी रजिस्ट्रेशन केलं. 12 वाजून 04 मिनिटांनी दोन मंडळांना प्रो गोविंदा आयोजकांनी यांनी संधी दिली आहे. मात्र 12:04 मिनिटांनी जय जवान गोविंदा पथकाने रजिस्ट्रेशन केलं, मात्र आम्हाला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे कुठेतरी जय जवान गोविंदा पथकावर या आयोजकांकडून अन्याय करण्यात आला आहे, असं विजय निकम म्हणाले. तसेच दहा तारखेला रजिस्ट्रेशन करताना गोविंदा आयोजकांच्या वेबसाईटसुद्धा स्लो चालत होती, असंही विजय निकम यांनी सांगितले.  

नेमकं प्रकरण काय?

-प्रो-गोविंदा स्पर्धेत जय जवान गोविंदा पथकाला डावलले.
– आयोजकांनी राजकारण करुन डावलल्याचा आरोप
– ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात जय जवान गोविंदा पथकाने थर लावत सलामी दिली होती.
– प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक करतात प्रो-गोविंदाचं आयोजन
– आयोजकांनी जय जवानचे आरोप फेटाळले 
– जय जवान पथकानेच स्पर्धेत नोंदणीस उशीर लावल्याचे स्पष्टीकरण
– १० जूनला दु.१२ पर्यंत होती स्पर्धेसाठी नोंदणीची मुदत-आयोजक
– प्रो गोविंदासाठी ३२ पथकांना संधी दिली जाते-आयोजक
– गेल्या वर्षीच्या उपविजेत्यांचीही यंदा संधी नाही-आयोजक
– जय जवान गोविंदा पथकाने आयोजकांचे स्पष्टीकरण फेटाळले.
– आम्ही दु. १२.०४ वा. नोंदणी केली असा जय जवान पथकाचा दावा
– खोपटचा राज आणि नूतन बालवाडीचीही नोंदणी दु. १२.०४ची
– जय जवान पथक काही सेकंदांमुळं मागे राहिले-आयोजक

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *