Headlines

Jannat Zubair : भरदिवसा हायवेवर भावासह माझ्यावर हल्ला..; अखेर जन्नत झुबैरने सांगितलं सत्य

Jannat Zubair : भरदिवसा हायवेवर भावासह माझ्यावर हल्ला..; अखेर जन्नत झुबैरने सांगितलं सत्य
Jannat Zubair : भरदिवसा हायवेवर भावासह माझ्यावर हल्ला..; अखेर जन्नत झुबैरने सांगितलं सत्य


जन्नत झुबैर आणि तिचा भाऊ अयानImage Credit source: Instagram

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार जन्नत झुबैरबद्दल धक्कादायक माहिती समोर आली होती. जन्नत आणि तिचा भाऊ अयान यांच्यावर हल्ला झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तेव्हापासून या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात होती. अखेर याप्रकरणी जन्नतच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. जन्नतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबद्दलची पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

जन्नत आणि अयान काही दिवसांपूर्वी त्यांच्या खासगी कामानिमित्त पनवेलला जात होते. तेव्हा हायवेवर त्यांच्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला आणि त्यांचा पाठलाग केला, असं म्हटलं जात होतं. सोशल मीडियावर यासंदर्भातली पोस्ट व्हायरल झाली आणि त्यात जन्नतसोबत अयानसुद्धा जखमी झाल्याचा दावा करण्यात आला होता.

जन्नतच्या टीमचं स्पष्टीकरण-

इथे शेअर केलेल्या अपडेटवरच विश्वास ठेवण्याची आम्ही विनंती करतो. कृपया अफवा किंवा व्हेरिफाय न केलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असं जन्नतने स्पष्ट केलं आहे. या पोस्टमध्ये तिच्या टीमने लिहिलंय, ‘आम्ही सर्वांना हे कळवू इच्छितो की, काल भरदिवसा महामार्गावर जन्नत आणि अयान यांना एका अत्यंत त्रासदायक प्रसंगाचा सामना करावा लागला. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांचा पाठलागही करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस प्रशासन सक्रियपणे शोध घेत आहेत. जन्नत आणि अयान आता सुरक्षित आहेत. तुमच्या काळजीबद्दल आणि पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो.’

जन्नतने वयाच्या 8 वर्षांपासूनच अभिनयक्षेत्रात काम करण्यात सुरुवात केली होती. तिने ‘दिल मिल गए’, ‘काशी: अब ना रहे तेरा कागज कोरा’, ‘फुलवा’, ‘भारत के वीर पुत्र: महाराणा प्रताप’, ‘तू आशिकी’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर जन्नतने सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडीओ बनवण्यात सुरुवात केली, जे नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले. म्युझिक व्हिडीओ आणि त्यानंतर पंजाबी इंडस्ट्रीत पदार्पण.. असा तिच्या करिअरच्या आलेख चढताच राहिला. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 50 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्सच्या बाबतीत जन्नतने शाहरुख खान, कपूर, शिल्पा शेट्टी यांसारख्या मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे तर वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी तिने मुंबईत हक्काचं घरसुद्धा खरेदी केलं आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *