Headlines

Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?

Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?


बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतल्यानंतर महायुतीसाठी लढत सोपी झाली असली, तरी ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. कारण एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 30 जणांनी माघार घेतली असली तरी अजूनही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी काँग्रेसच्या निर्णयाचे स्वागत करत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. “ही निवडणूक दादांसाठी लढत आहोत. त्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्रासाठी काम केले. सर्व पक्षांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या प्रती खरी आदरांजली आहे,” असे ते म्हणाले. जय पवार यांनी सांगितले की, उर्वरित उमेदवारांनाही माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. “कालपासून आम्ही सर्व उमेदवारांशी संपर्क साधत आहोत. अनेकांच्या छोट्या-छोट्या मागण्या आहेत. त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे राजकीय वातावरणात सकारात्मक संदेश गेल्याचे त्यांनी नमूद केले. “सर्व पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढत आहेत, हे समाधानकारक आहे. भविष्यात काँग्रेसला काही अडचणी आल्या तर आम्हीही मदत करू,” असे सांगत त्यांनी काँग्रेसचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *