Headlines

Jitendra Awhad and Gopichand Padalkar: संतोष देशमुखांच्या भावाला धक्का लागला म्हणून मी…. गोपीचंद पडळकरांसोबतच्या वादावर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

Jitendra Awhad and Gopichand Padalkar: संतोष देशमुखांच्या भावाला धक्का लागला म्हणून मी…. गोपीचंद पडळकरांसोबतच्या वादावर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
Jitendra Awhad and Gopichand Padalkar: संतोष देशमुखांच्या भावाला धक्का लागला म्हणून मी…. गोपीचंद पडळकरांसोबतच्या वादावर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?


Jitendra Awhad and Gopichand Padalkar clash: सध्या मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळातील दोन्ही सभागृह आणि बाहेरही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली पाहायला मिळत आहे. अशातच बुधवारी विधिमंडळाच्या आवारात एक धक्कादायक प्रकार घडला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यात विधिमंडळाच्या आवारात वाद झाला. यावेळी शिवीगाळ झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सगळ्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. (Maharashtra Vidhansabha Adhiveshan)

जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, गोपीचंद पडळकर काल म्हणाले की, कोणी माझ्या गाडीसमोर आले तर मी असाच दरवाजा उघडणार. हा सत्तेचा माज आहे. त्याच्या गाडीचा दरवाजा मला नाही संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याला लागला आणि म्हणून मी बोललो. त्यानंतर गोपीचंद पडळकर हा  विधिमंडळ परिसरात शिव्या द्यायला लागला. तुम्ही जर अशीच गाडी चालणार असाल तर आम्ही आता त्याला काय करणार, बंदुका घेऊन या… जीव घ्या आमचा. मी परवाच्या दिवशी फक्त मंगळसूत्र चोर म्हणून  बोललो म्हणून एवढा राग आला. मी मंगळसूत्र चोर का बोललो? कारण मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. मला त्यादिवशी तो ‘अर्बन नक्षल’ आणि  ‘मुसलमानांचा एक्स’,  असं म्हणाला. मी पंधरा-वीस कार्यकर्त्यांसोबत फिरत नाही, मी एकटा फिरतो. घाला गाडी माझ्यावर, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात जात असताना “मंगळसूत्र चोराचा…मंगळसूत्र चोराचा..”, अशा घोषणा दिल्या होत्या. आव्हाड यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावरुन, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडले होते. गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबीयांवर खालच्या भाषेत टीका करतात. यावरुन अनेकदा वादही झाला आहे. मात्र, गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार आणि त्यांच्या घराण्याला लक्ष्य करताना दिसतात. 

आणखी वाचा

Video: आव्हाड-पडळकर समोरासमोर भिडले; तुझ्या गांxx दम किती बघतो, विधानभवनाबाहेरच नेत्यांचा राडा

भाजपचे बेलगाम आमदार गोपीचंद पडळकरांची बरळण्याची मालिका सुरुच; आता सुप्रिया सुळेंच्या कुटुंबावर नाव न घेता जीभ घसरली

मंगळसूत्र चोराचा…मंगळसूत्र चोराचा..! जितेंद्र आव्हाडांची गोपीचंद पडळकरांसमोर घोषणाबाजी VIDEO

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *