Headlines

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: विधीमंडळात गुंडगिरी करत हाणामारी, 4 वर्षांपासून पडळकरांसोबत सावलीसारखा; आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर हात टाकणारा ऋषिकेश टकले आहे तरी कोण?

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: विधीमंडळात गुंडगिरी करत हाणामारी, 4 वर्षांपासून पडळकरांसोबत सावलीसारखा; आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर हात टाकणारा ऋषिकेश टकले आहे तरी कोण?
Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: विधीमंडळात गुंडगिरी करत हाणामारी, 4 वर्षांपासून पडळकरांसोबत सावलीसारखा; आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर हात टाकणारा ऋषिकेश टकले आहे तरी कोण?


Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असून आज (18 जुलै 2024) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा (Maharashtra Politics) गाडा जिथून हाकला जातो, ते विधान भवन. याच विधानभवनात काल (गुरुवार, 17 जुलै) तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं.  

महाराष्ट्रातील (Maharashtra News) सर्वसामान्य जनतेला आपल्या लोकप्रतिनिधींची लाज वाटेल, असा आणखी एक प्रकार विधानभवनात घडला. सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या दारात काल शिविगाळ केली, एकमेकांना धमक्याही दिल्या. त्यातच त्यांचे समर्थक वरताण निघाले, त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या आणि विधानभवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी केली. एवढंच पुरेस नव्हतं, तर मध्यरात्रीच्या सुमारास विधान भवनाच्या गेटवर हायव्होल्टेज राडा झाला. 

विधान भवनाच्या गेटवर मध्यरात्री काय घडलं? 

मध्यरात्री जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांचं विधान भवनाच्या गेटवर आंदोलन सुरू होतं,नितीन देशमुखांना पोलीस स्टेशन घेऊन जात असल्यामुळे आंदोलन करणात आलं. याविरोधात मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी केली. काही वेळातच नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. पोलिसांची गाडी अडवून बसलेल्या जितेंद्र आव्हाडांना देखील पोलिसांनी मागे खेचलं. मध्यरात्री आमदार रोहित पवारसुद्धा आंदोलनस्थळी दाखल झाले आणि झालेल्या सर्व प्रकाराचा त्यांनी निषेध व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांमध्ये नेमकं काय घडलेलं? 

लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या विधिमंडळासाठी आजचा दिवस गालबोट लावणारा ठरला. आणि त्यासाठी कारणीभूत ठरले, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचे समर्थक. खरं तर यांना समर्थकांपेक्षा गुंड म्हटलेलं जास्त उचित ठरेल. कारण पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा घातला. एकमेकांची कॉलर पकडत हाणामारी केली. गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर हे समर्थक आपापसांत भिडले. या राड्याला पार्श्वभूमी आहे, ती गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातल्या परवाच्या (16 जुलै, बुधवार) वादाची. या दोन्ही नेत्यांनी काल गाडीचा दरवाजा जोरानं लावण्यावरून एकमेकांना शिवीगाळ केलेली.

पडळकर-आव्हाड कार्यकर्ते भिडले, ते नेमकं कशासाठी?

विधानभवनाच्या पायऱ्यांवर गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांशी गप्पा मारत उभे होते, जितेंद्र आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकरांमध्ये पायऱ्यांवरच वादाची ठिणगी पडली. गोपीचंद पडळकर नितीन देशमुखांच्या दिशेनं सरसावले, पण त्यांनी कार्यकर्त्यांनी रोखलं, गोपीचंद पडळकरांचे समर्थक ऋषी टकले आणि आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुखांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हाणामारीच्या तक्रारीसाठी जितेंद्र आव्हाड जयंत पाटलांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून पडळकरांना तातडीनं बोलावलं गेलं. बावनकुळेंशी चर्चेनंतर गोपीचंद पडळकरांकडून माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त करण्यात आली. पोलिसांकडून नितीन देशमुख, ऋषिकेश टकलेंचे जबाब नोंदवले गेले. 

मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आहे तरी कोण? (Who Is Hrishikesh Takale?)

आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असलेला ऋषिकेश टकले यानं राष्ट्रवादीचे पदाधिकारी, जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर कार्यकर्ते नितीन देशमुखांना विधिमंडळाच्या दारात मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करूनही टकले हा वारंवार देशमुखांच्या अंगावर धावून गेला. अगदी रस्त्यावर गुंडगिरी होते, तशी गुंडगिरी त्यानं विधिमंडळाच्या लॉबीत करण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन चार वर्षांपासून ऋषिकेश टकले हा गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सावलीसारखा सोबत असतो. मतदारसंघात फिरताना, विविधं उद्घाटनं आणि सभा संमेलनात तसेच अधिवेशन काळात, टकले हा गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असतो.

ऋषिकेश टकले हा गेल्या काही वर्षांपासून गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. टकले हा पलूस तालुक्यातील माळवाडी गावचा आहे. त्याची स्वतःची हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना असून तो या संघटनेचा  सांगली जिल्हा अध्यक्ष आहे. महिलेचा विनयभंग, मारामारी करणं, गंभीर इजा होईल अशी दुखापत करणं, शासकीय कामात अडथळा आणणं, असे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. 

ऋषिकेश टकलेवर भारतीय दंड विधान कलम 324, कलम 323, कलम 504, कलम 506, कलम 143, कलम 147, कलम 148, कलम 354 (ब), कलम 323, कलम 504, कलम 114, कलम 332, कलम 148, कलम 353, कलम 352, कलम 504, कलम 506, कलम 365, कलम 307, अशा कलमान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.  

ऋषिकेश टकले मकोकाचा आरोपी? 

जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारा गोपिचंद पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले मकोकाचा आरोपी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय, त्यासाठी कारण आहे. जितेंद्र आव्हाडांनी केलेला गंभीर आरोप. पडळकरांचा कार्यकर्ता मकोकाचा आरोपी असल्याचा गंभीर आरोप, जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. मकोकाचे आरोपी विधानभवनात मारण्याचं प्लॅनिंग करतात, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 

पाहा व्हिडीओ : Jitendra Awhad UNCUT Rada :पोलिसांना भिडले, रस्त्यावर झोपले; कार्यकर्त्यासाठी आव्हाडांनी रान पेटवलं!

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jitendra Awhad and Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी कानात काहीतरी सांगितलं अन् ऋषिकेश टकले आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर तुटून पडला; आव्हाडांनी ‘तो’ व्हिडीओ दाखवला

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *