
Jyoti Waghmare slams Rashmi Thackeray: अतिवृष्टीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत केली तरी त्यांनी मदत साहित्यावर फोटो लावले म्हणून ठाकरे गटाने त्यांच्यावर टीका केली. अरे किती जळाल? यापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तुमचे फोटो लावून मदत करत होते, तेव्हा नाही म्हणालात का, आमचे फोटो लावू नका. एवढेच नव्हे मध्यंतरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटण्यात आले तेव्हा त्यावर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे फोटो होते. आदित्य ठाकरे तुम्हाला बहीण नाही, हे माहिती आहे. पण तुमच्या आईने रश्मी वहिनी (Rashmi Thackeray) तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार दिलेत का, असा सवाल शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला. त्या गुरुवारी मुंबईतील नेस्को मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ग्रीन कार्पेट घालून दौरा केला होता. मी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून मला ठाकरे गटाकडून सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले. पण ही ज्योती म्हणजे फ्लॉवर नाही, तर फायर है. मी कोणतेही पद नसताना कशाच्या जीवावर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होते, असा सवाल अनेकजण विचारतात. तर मला हा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिला आहे. मी दलित बेटी आहे, या संविधानाने मला प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे, असे ज्योती वाघमारे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात म्हटले होते आम्ही 200 आमदार निवडून येऊ, पण त्यापेक्षा जास्त आले. मुंबईत दिवार पिच्चर सुरू आहे. भाऊ भाऊ मिलेंगे की बिचछेंगे. ठाकरेंचा पराभव ठाकरेंनी केला हे जगाने पाहिले. भावाचा मुलगा आहे हे पाहिल्यावर राज ठाकरेंनी उमेदवार दिला नाही. उद्धव ठाकरे आजारी असताना राज ठाकरे गेले. मात्र, राज ठाकरेंचा मुलगा आजारी असताना उद्धव ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक फोडले. पेंग्विनला आमदार करायचा होता म्हणून दोन आमदार दयावे लागले. आदित्य ठाकरेंनी आता तरी काम करावे, नुसत्या पार्ट्या करू नका. मी मुख्यमंत्री मुलगा, कॅबिनेट मंत्री म्हणून जनतेने हे दिवस दाखवले, अशी टीकाही ज्योती वाघमारे यांनी केली.
आणखी वाचा
आणखी वाचा