Headlines

Kabutarkhana : कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका; ठाकरेंचा टोला

Kabutarkhana : कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका; ठाकरेंचा टोला
Kabutarkhana : कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका; ठाकरेंचा टोला


राज्यात कबूतर वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले. कबूतरांना कंट्रोल फिडींग करण्यासंदर्भात अभ्यास करून नियम तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेने कंट्रोल फिडींग सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. “एकही कबूतर मरना नहीं चाहिए,” असा आदेश मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला दिला असून, आजपासून कबूतरखाने उघडून फिडींगचे काम सुरू होईल असेही सांगितले. दरम्यान, कबूतरांना कंट्रोल फिडिंग करण्यावरून आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. कबूतरखाना ठेवायचा असेल तर लोढांच्या वरळी सीपीएसवरील बंगल्याजवळ जागा द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. स्थानिकांच्या भावनांसोबत असल्याचेही त्यांनी म्हटले. नागरिकांनी कबूतरखाना तात्काळ उघडण्याची आणि दाणा-पाणी सुरू करण्याची मागणी केली आहे. मेलेल्या कबूतरांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तात्पुरते नव्हे, तर कायमस्वरूपी उपाययोजना हवी, अशी त्यांची मागणी आहे. “जसा माणूस मिरायची पाळीवर असेल आणि वेंटीलेटरवर टाकताय तसा आम्हाला वेंटीलेटर नको, आम्हाला श्वास चक्लिअर पाहिजे. हे टेम्पररी वेंटीलेटर नको, वेंटीलेटर काढला की माणूस मेला अशा नको. परमनेंट सोल्युशन पाहिजे,” असे नागरिकांनी म्हटले. जखमी कबूतरांना वाचवण्यासाठी बीएमसीने मदत केली नाही, अशी तक्रारही त्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *