Headlines

Kalyan Crime: मराठी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारणारा गोकुळ झा कोण? सगळी कुंडली समोर आली

Kalyan Crime: मराठी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारणारा गोकुळ झा कोण? सगळी कुंडली समोर आली
Kalyan Crime: मराठी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारणारा गोकुळ झा कोण? सगळी कुंडली समोर आली


Kalyan Hospital Receptionist Case: कल्याणमधील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा गोकुळ झा (Gokul Jha) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अविनाश जाधव यांच्या आदेशावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी (MNS) या गोकुळ झा याला शोधायला सुरुवात केली होती. ही शोधमोहीम सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांनी पोलिसांच्या आधी मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी गोकुळ झा या शोधून काढले. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या परप्रांतीय गोकुळ झा याचा सगळा कच्चाचिठ्ठा उघड झाला आहे. (Kalyan Crime news)

गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या नावावर कल्याण, कोळशेवाडी, उल्हासनगर या परिसरात दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून गोकुळ झा हप्ते वसुली करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याची चौकशी करून त्याला कठोर शिक्षा कशी होईल, यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.

गोकुळ झा हा चार दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. गोकुळवर याआधी दोन गुन्हे दाखल आहेत. हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे, असे २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा विठ्ठलवाडी आणि एक गुन्हा कोसळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका गुन्ह्यांत त्याने हत्याराने मारहाण केली होती तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याने ट्रक चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये सदरील ट्रक चालकाने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गोकुळला अटक झाली होती. चार दिवसांपूर्वीच गोकुळ हा जामिनावर सुटून बाहेर आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील मुख्य आरोपी गोकुळ झा सह त्याचा भाऊ रणजीत झाला अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आता न्यायालयात पोलीस त्याच्याविरोधात काय माहिती देतात आणि न्यायालय काय निकाल देते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

त्याला आम्ही धडा शिकवणार, मारहाण झालेल्या तरुणीची भेट घेत मनसेचा इशारा; उपचाराची घेतली जबाबदारी

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *