Headlines

कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सा.बां. विभागातील अभियंत्याची बॅटिंग; बनावट कागदपत्रे बनवली, गुन्हा दाखल

कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सा.बां. विभागातील अभियंत्याची बॅटिंग; बनावट कागदपत्रे बनवली, गुन्हा दाखल
कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सा.बां. विभागातील अभियंत्याची बॅटिंग; बनावट कागदपत्रे बनवली, गुन्हा दाखल


वाशिम : सांगलीत एका तरुण ठेकेदाराने कर्जापोटी आणि आपण केलेल्या कामाचे बिलं शासनाने अदा न केल्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. एकीकडे कंत्राटदाराने जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याने बनावट कागदपत्रे बनवत सह्या केल्याचा धक्कादायक घोटाळा समोर आला आहे. वाशिममधील (Washim) सार्वजनिक बांधकाम विभागात हा प्रकार घडल्यानंतर पोलिसात (police) गुन्हा दाखल केला आहे. 

वाशिम शहरातील विकास कामे वारंवार मुदतवाढ घेऊनही पूर्ण न करणाऱ्या मे. अजयदीप इन्फ्राली औरंगाबाद या कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करून काळ्या यादीत टाकण्याबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र, वाशिमच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन उपविभागीय अभियंता दिनकर नागे यांनी कंत्राटदाराच्या फायद्यासाठी तक्रारकर्त्याचे बनावट पत्र तयार करत खोटी सही करुन या पत्राचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात तत्कालीन उपविभागीय अभियंता दिनकर नागे आणि लिपिक प्रिया तुपलोढे यांच्याविरुद्ध वाशिम शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील राम पाटील डोरले यांनी वाशिम शहरातील विकासकामे वारंवार मुदतवाढ घेऊनही पूर्ण न करणे, तसेच निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या मे. अजयदीप इन्फ्राली औरंगाबाद या कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करून काळ्या यादीत टाकण्याबाबत तक्रार केली होती. मात्र, कारवाई न झाल्यामुळे त्यांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पोहरादेवी येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमात आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी त्यावेळी हस्तक्षेप करून त्यांना थांबवलं. त्या दरम्यान, अभियंता दिनकर नागे यांनी एक बनावट पत्र तयार करून राम डोरले यांची खोटी सही आणि चुकीचं नाव वापरून डोरले यांनी केलेली तक्रार मागे घेत असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे ते पत्र मंत्रालयातील उपमुख्य सचिवांच्या नावाने सादर केल्याचेही उघड झालं आहे, त्यावरुन हा सगळा प्रकार समोर आला. 

अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

या खोट्या कागदपत्राद्वारे ठेकेदाराच्या बाजुने संगनमताने फसवणूक करण्यात आल्याची तक्रार डोरले यांनी दाखल केली आहे. त्याआधारे वाशिम पोलिसांनी अभियंता दिनकर नागे आणि लिपिक प्रिया तुपलोढे यांच्याविरुद्ध 23 जुलै रोजी भारतीय न्याय संहिता कलम 318 (3), 336 (2) (3), 340 (2), आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार देवेंद्रसिंह ठाकूर, यांनी दिली.  

हेही वाचा

मोठी बातमी! कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश? शेरोशायरीतून दिले संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे…

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *