Deputy CM Ajit Pawar: लोकसभेला मोठा फटका बसला होता.कार्यकर्ता खचला होता.महाविकास आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या.पण दुपारपर्यंतचं निकाल लक्षात आला. जून चा अर्थसंकल्प सादर करत असताना काही योजना तयार केल्या. लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय झाली. 7.5 एचपीपर्यंत विज बिले माफ केली. विरोधकांनी टीका केली पण आम्ही करुन दाखव्याचे अजित पवार म्हणाले. लागलेला निकाल महाविकास आघाडीला पचला नाही.ईव्हीएमबाबत टीका टीपणी करण्यास सुरवात केली. आंदोलने करण्यास सुरवात केली.त्यांच्या कार्यकर्त्यांना बर वाटावं यासाठी त्यांनी हे केल्याची टीका त्यांनी केली.
बारामतीकरांना 14 तारखेलाचं भेटून आभार मानायचे मी ठरवले होते. आता माझी जबाबदारी वाढली आहे. बारामती विधानसभेला अनेकांच लक्ष लागले होते पण कार्यकर्ता कामाला लागला होता,वेगवेगळे आरोप झाले टीका झाल्या. पण आम्ही मतदारांना आवाहन करत होतो.
काँग्रेस एकसंघ असताना विरोधक कमकुवत असताना जे मतदान झाल नसताना ते मतदान 2024 ला चाँद्यापासून बांध्यापर्यंत जनतेने केले. बारामतीकरांनी मोठी जबाबदारी टाकली.लोकसभेच्या निकालानंतर ही निवडणूक आली होती.मोजणी दिवशी पोस्टल मोजणीत अजित पवार पिछाडीवर असं काही वाहिन्यांनी चालवलं.आई तर देवघरामसोरचं बसली पांडुरंगा पांडुरंगा म्हणत.ती म्हणाली असं कसं झालं पण बारामतीकरांनी करिश्मा करुन दाखवल्याचे ते म्हणाले.
‘राज्याची आर्थिक शिस्त बिघडवून देणार नाही’
आम्हाला महत्वाची खाती मिळाली आहेत. आता योग्य जबाबदारी पार पाडली जाईल. 3 मार्च ला अर्थसंकल्प मांडला जाईल जनतेने ज्या अपेक्षेने निवडणून दिले आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन,राज्याची आर्थिक शिस्त बिघडवून देणार नाही. जानाई शिरसाई, लाकडी निंबोडी सिंचन योजना पाणी अशी कामे असतील ती मार्गी लावली जातील. वडवणी बंधरावरती छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक करीत आहोत.अनेकांची कामाबाबात निवेदन येत आहेत. संघटनेमध्ये उत्साह आणता येईल यासाठी काही बदल करत आहोत. वेगवेगळ्या संस्था चालवण्यासाठी केंद्राची मदत कुठे कुठे घ्यावी लागेल याचा प्रयत्न करतो आहे.काही कार्यकर्ते कामे घेतात पण ती दुस-याला देतात हे धंदे बंद करा.ज्याच्यात धमक असेल त्यानेच काम घ्या.पारदर्शक कामे करा, असे आवाहन त्यांनी केली.
‘फाशीची शिक्षा झाल्याशिवाय सोडायच नाही’
गुन्हेगारी वाढली आहे.मी पोलिसांना सांगितले आहे कोणीही असले तरी सोडू नका. सरपंचाचा खून झाला. माणूसकीला काळींबा फासणारी घटना घडली.वरीष्ठ पोलिस अधिका-याकडून चौकशी केली जाईल.कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल पण देशमुख यांच्या खूनाचा मास्टरमाईंड शोधणार.सिव्हिल सर्जन म्हणाला आयुष्यात अशी केस बघितली नाही.कोणीही असू द्या सोडणार नाही.आम्हाला शर्मेनी मान खाली घालावी लागते.या शहाण्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय सोडायच नाही असं आम्ही ठरवल्याचे अजित पवार म्हणाले.
सोशल मिडियाचा वापर चिंताजनक
परभणी मध्ये ही दोन घटना घडल्या.गेलेली व्यक्ती परत येणार नाही पण त्यांच स्वप्न पूर्ण करण्याचं आश्चासन आम्ही दिलं आहे.बारामतीत देखील काही घटना घडत आहेत.सोशल मिडियाचा होणारा वापर चिंताजनक आहे.पालकांनी मुलामुलिंकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. पालकांनी मुलांसोबत संवाद ठेवायला शिका. महिलांनी शक्ती अँप ला सहकार्य करा
सुप्रिया सुळेंना टोला
मी कोणाच्या जमिनी बळकावण्यासाठी इथे आलो नाही. पण तालुक्याच्या विकासासाठी मला पुढे साथ द्या. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दहा हत्तीचं बळ येतं. जेव्हा निवडणून विधानभवनात गेलो तेव्हा एक लाखाच्या पुढे कोण कोण निवडणून आले त्याची यादी आली त्यात बारामतीचा प्रतिनिधी होता,छाती भरुन आली.आज कोणाला 500 रुपये देऊन आणले नाही,सगळे स्वेच्छेने आले आहेत असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.मंत्रिमंडळ विस्तार मध्ये काहींना थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला.नव्यांना पण संधी द्यावी लागते.पण कारण असताना वेगळ्या पद्धतीची भूमिका घेणे वक्तव्य करण हे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.भाजप सोबत असलो तरी पक्ष शिवशाही फुले आंबेडकर विचारसरणीचाच विचार असल्याचे ते म्हणाले.