
मुंबई : मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जन करण्यात आलं आहे. लालबागच्या राजाच्या मूर्तीची उत्तर आरती झाल्यानंतर मंडळाचे पदाधिकारी आणि अनंत अंबानी यांच्या उपस्थितीत अत्याधुनिक तराफा अरबी समुद्रात दोन ते तीन किलोमीटर आत गेल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. अत्याधुनिक तराफ्यावरुन लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. लालबागच्या राजाची अखेरची झलक अनेकांनी त्यांच्या फोनमध्ये टिपली. तर, अनेकांनी गिरगाव चौपाटीवर प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि एबीपी माझाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी लालबागच्या राजाचं विसर्जन पाहिलं.
लालबागचा राजा आज सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. त्यापूर्वीच अरबी समुद्राला भरती आल्यानं विसर्जनात अडथळा निर्माण झाला होता. भरती आणि ओहोटीची परिस्थिती निर्माण झाल्यानं विसर्जनाला साडे बारा ते तेरा तासांचा वेळ लागला. समुद्राला ओहोटी आल्यानंतर लालबागच्या राजाचा गणपती नव्या अत्याधुनिक तराफ्यावर साडे चार वाजता ठेवण्यात यश आलं होतं. लालबागच्या राजाच्या गणपतीच्या विसर्जनापूर्वीच्या उत्तर आरतीला उद्योजक अनंत अंबानी उपस्थित होते.
अरबी समुद्रात विसर्जनासाठी लालबागच्या राजाच्या गणपतीची मूर्ती घेऊन तराफा साडे आठच्या दरम्यान निघाला . या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. दरवर्षी लालबागच्या राजाचं सकाळी साडे आठच्या दरम्यान विसर्जन होतं. मात्र, अरबी समुद्राला भरती आल्यानं गणपतीची मूर्ती नव्या तराफ्यावर ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या. ओहोटी सुरु झाल्यानंतर नव्या तराफ्यावर गणपतीची मूर्ती साडे चार वाजता ठेवण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा दागिने आणि आभूषणं लालबागच्या राजाला घालण्यात आली. विसर्जनापूर्वीची उत्तर आरती अनंत अंबानी यांच्या उपस्थितीत पार पाडली.
लालबागच्या राजाच्या विसर्जनाला काल सुरुवात झाली तेव्हा ज्या प्रकारे गर्दी होती त्याच पद्धतीनं गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. अनंत चतुर्दशी म्हणजेच काल सकाळी 12 वाजता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली होती. आज सकाळी साडे आठ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. अखेर 12 तासानंतर रात्री साडे आठच्या सुमारास भरती पुन्हा सुरु झाल्यानं लालबागच्या राजाच्या विसर्जनाची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली. बारा तासांचा वेळ झाला तरी लालबागच्या राजाच्या भक्तांचा गिरगाव चौपाटीवरील उत्साह मात्र कायम आहे.
गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राज्याच्या अखेरचा निरोप देण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महापालिका, कोस्टगार्ड आणि मुंबई पोलीस दलानं तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता. या ठिकाणी गणेश भक्त देखील गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी कोळी बांधव देखील उपस्थित आहेत. कोळी बांधवांकडून गेल्या 24 वर्षांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यामध्ये मदत केली जाते.
आणखी वाचा