
मुंबईच्या गणेशोत्सवाचे सर्वात भव्य आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा अभूतपूर्व खोळंबा पाहायला मिळाला. ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल तेहेतीस तासानंतर ७ सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरगाव चौपाटीवर विसर्जनाने संपन्न झाली. यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या मोटराईज्ड तराफ्याचा वापर करण्यात आला. मात्र, या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळकाऊ ठरली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर मूर्ती तराफ्यावर स्थिर करण्यात यश आले. मूर्ती तराफ्यावर विराजमान झाल्यानंतर समुद्रात योग्य भरतीची प्रतीक्षा करावी लागली. भरतीची योग्य पातळी रात्री नऊ वाजता प्राप्त झाल्यानंतरच विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली आणि लालबागच्या राजाचे विसर्जन पार पडले. तेहेतीस तासांच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना अपार संयम आणि त्यांच्या श्रद्धेची कसोटी लागली होती.
आणखी पाहा