
Lalbaugcha Raja: प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी नुकतेच आपल्या संपूर्ण कुटुंबासह ‘लालबागच्या राजाचे’ (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी त्यांनी केलेल्या मोठ्या दानामुळे उपस्थित भाविकांमध्ये आणि सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली आहे. या दानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
500 रुपयांच्या नोटांचे बंडल भरलेली पिशवी!
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सिंघानिया यांनी एका मोठ्या पिशवीतून 500 रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल दानपेटीत अर्पण केले. कार्यकर्त्यांनी एकामागून एक बंडल बाहेर काढून दानपेटीत टाकले. यामुळे, त्यांनी दिलेल्या देणगीची रक्कम लक्षणीय आणि मोठी असल्याचे स्पष्ट होते. मात्र, ही नेमकी रक्कम किती होती याबाबत मंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
VIDEO | Raymond Chairman Gautam Singhania (@SinghaniaGautam) take blessings from Ganpati Bappa at Lalbaugcha Raja pandal in Mumbai.#GaneshChaturthi #LalbaugchaRaja2025 pic.twitter.com/vBIxhxmW0j
— Press Trust of India (@PTI_News) September 3, 2025
‘लालबागचा राजा’ श्रद्धेचा महासागर
‘लालबागचा राजा’ हे गणेशोत्सवाचे सर्वात मोठे आणि श्रद्धेचे केंद्र मानले जाते. महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. राजकारण, मनोरंजन, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर दरवर्षी येथे हजेरी लावतात. यंदाही हजारो भाविक तासन्तास रांगेत उभे राहून बाप्पाचे दर्शन घेत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
यंदा सिंघानिया यांच्या दानाची विशेष चर्चा
गेल्या काही वर्षांत ‘लालबागचा राजा’ मंडळाला देशभरातून आणि परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर दान प्राप्त झाले आहे. पण यावर्षी गौतम सिंघानिया यांनी स्वतः उपस्थित राहून जे दान अर्पण केले, त्याची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
लाडक्या बाप्पाला आज निरोप
दरम्यान, लाडक्या बाप्पाला निरोप आज दिला जात आहे. गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती चौपाटीवर करण्यात आली आहे. सोबतच, मुंबई पोलिसांची देखील मोठी कुमक तैनात असणार आहे. परदेशी पाहुणे आणि व्हीव्हीआयपींना राज्य गणेशोत्सव बघता यावा यासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडून मंडपांची उभारणी केली गेली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा