Headlines

लंडनहून येताच हवाई सुंदरीला घरी नेऊन अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी पायलटला अटक

लंडनहून येताच हवाई सुंदरीला घरी नेऊन अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी पायलटला अटक
लंडनहून येताच हवाई सुंदरीला घरी नेऊन अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी पायलटला अटक


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदीच्या मुद्द्यावरुन मिरा भाईंदरमधील वातावरण तापलं असताना आता, मिरा भाईंदर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला एअर होस्टेसने तिच्या सहकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. महिला एअर होस्टेसचा (Air hostess) सहकारी हा पेशाने पायलट आहे, त्यावर गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. लंडनवरील फ्लाईटने मायदेशी परतल्यानंतर आरोपीने स्वत:च्या घरी नेत हवाई सुंदरी असलेल्या महिलेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी (Police) अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीचे नाव देवाशिष शर्मा असे असून तो व्यावसायिक पायलट आहे. पीडिता व आरोपी दोघेही मीरा रोड परिसरात राहत असून दोघांमध्ये पूर्वीपासूनच व्यावसायिक परिचय होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकत्र लंडनहून विमान प्रवास केला होता, लंडनहून परतल्यानंतर देवाशिष शर्माने पीडितेला तिच्या घरी न जाता स्वतःच्या घरी येण्याचा आग्रह केला. तिने सहकाऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवत त्याचे घर गाठले. पण तिथे गेल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीच्या आधारे नवघर पोलिस ठाण्यात आरोपी पायलट देवाशिष शर्मा याच्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी, न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सर्व पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. पोलिसांनी संबंधित महिला एअर होस्टेसचे जबाब नोंदवले असून इतर साक्षीदारांची चौकशीही केली जात आहे. या घटनेमुळे एअरलाइन इंडस्ट्रीत आणि स्थानिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

Video: सूरज चव्हाणांचा राजीनामा, छावाच्या प्रदेशाध्यांची रुग्णालयातून प्रतिक्रिया; तू संत नाहीस, तर मी शांत नाही

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *