Headlines

LPG Crisis: एलपीजी संकट कायमचं संपणार!’कृत्रिम सूर्य’ दिवस-रात्र उष्णता देणार, प्रयोगाची जोरदार चर्चा

LPG Crisis: एलपीजी संकट कायमचं संपणार!’कृत्रिम सूर्य’ दिवस-रात्र उष्णता देणार, प्रयोगाची जोरदार चर्चा
LPG Crisis: एलपीजी संकट कायमचं संपणार!’कृत्रिम सूर्य’ दिवस-रात्र उष्णता देणार, प्रयोगाची जोरदार चर्चा


Artificial Sun: बेंगळुरू येथील एका प्रयोगशाळेत अभियंते रात्रंदिवस एका अनोख्या प्रयोगात गढून गेले आहेत. हा प्रयोग अचाट, अफाट आणि मानवासाठी क्रांतीकारक ठरणार आहे. जीवाश्म इंधन अथवा पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांना मोठा फाटा मिळणार आहे. हायड्रोजनच्या अफलातून प्रयोगातून ऊर्जा निर्मिताचा हा प्रयोग जगात चर्चेला आला आहे. चीनमध्ये अगोदरच अशा प्रयोगाची सुरुवात झाली आहे. भारतही या लाटेत सहभागी झाला आहे. सूर्याच्या आत जशी ऊर्जा तयार होते. तसाच काहीसा हा प्रयोग आहे. या प्रयोगानंतर सध्याच्या ऊर्जा संकटावर मात करता येईल. एलपीजी संकट अथवा इतर ऊर्जा स्त्रोताला एक नवीन पर्याय समोर येत आहे.

हे टोकामक आहे तरी काय?

तर ऊर्जा निर्मितीसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याला टोकामक (Tokamak) या यंत्राचा वापर होतो. हे एक शक्तिशाली चुंबकीय वर्तुळ आहे. त्याचा वापर अत्याधिक उष्णतेला एका गोळ वर्तुळात करण्यासाठी होतो. ही लॅब एक खासगी स्टार्टअप आहे. ते फ्यूजन हॉर्डवेअर तयार करत आहे.

प्राणोस फ्यूजनचा प्रयोग

फ्यूजन तयार करण्याचा प्रयोग प्रगती पथावर असला तरी सर्वात मोठे आव्हान त्यासाठीच्या मोठ्या प्रमाणावरील खर्चाचे आहे. प्राणोस या पारंपारिक मोठ्या रिएक्टर्सऐवजी एका छोट्या प्रयोगावर लक्ष केंद्रित करत आहे. हाय टेम्परेचर सुपरकंडक्टिंग मॅग्रनेट च्या मदतीने अगदी छोट्या जागेत ऊर्जा तयार करण्याचा हा प्रयोग सर्वांनाच अचंबित करणारा आहे. अशोक सेंटर फॉर द पीपल-सेट्रिंक एनर्जी ट्रांझिक्शन या प्रयोगातील ज्येष्ठ संशोधक अनिमेष घोष यांनी या प्रयोगासाठी सध्या अनेक आव्हानं पुढ्यात असल्याचे म्हटले आहे. प्राणोस फ्यूजनचा ही कंपनी हा प्रयोग करत आहे. डॉ. शौर्य कौशल हे या संस्थेचे संस्थापक आहेत. लार्सन अँड टुब्रो सारख्या कंपन्या या क्षेत्रात फ्यूजन उपकरण तयार करण्याचे काम करत आहे. त्याचा फायदा अशा प्रकारच्या स्टार्टअप्सला होत आहे.

एलपीजीच नाही तर विजेचे संकटही संपुष्टात?

सर्व खर्च ग्राह्य धरता फ्यूजन ऊर्जेच्या माध्यमातून देशात केवळ एलपीजी संकटच नाही तर विजेचे संकटही संपुष्टात येईल. सध्या सौरऊर्जा प्रकल्पावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. फ्यूजन ऊर्जा तयार झाल्यावर 6 ते 8 रुपयांना ही वीज उपलब्ध होईल. त्यामुळे गावखेड्यापर्यंत वीज कंपन्यांना विद्युत पुरवठा करता येईल. तर सरकारने इंडक्शन संयत्रांसाठी काही खास सबसिडी आणि उत्पादन वाढवण्याची योजना सुरू केली आहे. परिणामी आयात कमी होईल आणि इतर देशावरील निर्भरता कमी होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *