Headlines

LPG Crisis : देशात पेट्रोल-डिझेलचा किती दिवसाचा साठा शिल्लक? दररोज किती लाख LPG सिलिंडरची मागणी? जाणून घ्या डिटेल्स

LPG Crisis : देशात पेट्रोल-डिझेलचा किती दिवसाचा साठा शिल्लक? दररोज किती लाख LPG सिलिंडरची मागणी? जाणून घ्या डिटेल्स
LPG Crisis : देशात पेट्रोल-डिझेलचा किती दिवसाचा साठा शिल्लक? दररोज किती लाख LPG सिलिंडरची मागणी? जाणून घ्या डिटेल्स


सध्या आपण देशाच्या वेगवेगळ्या भागात पेट्रोल पंपांवर आणि गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्याचं चित्र पाहतोय. एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक पेट्रोल पंपांवर काही तासात पेट्रोल-डिझेल संपल्याच्या बातम्या येत आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने देशात पेट्रोलियम आणि LPG पुरवठ्याची काय स्थिती आहे? ते चित्र स्पष्ट केलय. पेट्रोलियम आणि LPG पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आणि कंट्रोलमध्ये आहे. सर्व रिटेल फ्यूल आऊटलेट्सना भरपूर पुरवठा होतोय. देशात कुठेही पेट्रोल, डिझेल आणि LPG ची काही कमतरता नाहीय. जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवणारे आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका असं मंत्रालयाने नागरिकांना आवाहन केलं आहे.

पीआयबीच्या प्रेस रिलीजनुसार भारत जगातील चौथा सर्वात मोठा तेल रिफाईन करणारा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा पाचवा सर्वात मोठा निर्यातक देश आहे. भारताकडून 150 पेक्षा अधिक देशांना रिफाइन इंधनाचा पुरवठा होतो. भारताच्या राखीव तेल साठ्याची क्षमता 74 दिवसांची आहे. सध्या 60 दिवस पुरेल इतका तेल साठा आहे. मध्य पूर्वेत इराण विरुद्ध सुरु झालेल्या युद्धाला उद्या महिना होईल. पुढचे दोन महिने विनाअडथळा पुरवठा सुरु राहील इतकं कच्च तेल भारताकडे आहे. त्याशिवाय भारत सध्या मिळेल तिथून कच्च तेलं विकत घेत आहे.

LPG ची काय स्थिती?

आधी भारत जगातील 27 देशांकडून कच्च तेलं विकत घ्यायचा. आता 40 देशांकडून विकत घेतो. सध्या निर्माण झालेली संकटकालीन स्थिती लक्षात घेता भारताने तेल बाजारातील अन्य पर्यायांचा शोध सुरु केला आहे. जेणेकरुन देशवासियांना इंधन तुटवड्याचा सामना करावा लागू नये. देशात LPG ची कुठेही कमतरता नाही हे सरकारने स्पष्ट केलय. मंत्रालयाने एलपीजी नियंत्रणाचे आदेश दिल्यानंतर देशांतर्गत रिफायनरी उत्पादनात 40 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे दैनंदिन एलपीजी उत्पादन जवळपास 80 टीएमटी एकूण दैनंदिन आवश्यकतेच्या 50 टीएमटी म्हणजे आपल्या गरजेच्या 60 टक्क्यापेक्षा अधिक झालय.

दररोज सिलिंडरची मागणी किती लाख?

तेल कंपन्या दररोज 50 लाखापेक्षा जास्त सिलेंडरची डिलीवरी करत आहेत. वेळेवर गॅस मिळणार नाही या भितीपोटी ग्राहकांकडून ऑर्डर देण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळे सिलिंडरची मागणी 89 लाखापर्यंत पोहोचली होती. आता ती कमी होऊन 50 लाख सिलिंडरवर आली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *