नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील साफसफाई विभागत कंत्राटी कामगार कार्यरत असून आजतगायत त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. या बाबत संबंधित विभागाला सांगुन ही कोणतीही कारवाही करण्यात येत नाही.
सदर कर्मचारी तुटपुंज्या वेतनात काम करत आहेत. तेच वेतन महिन्याच्या 10 तारखेच्या आत नाही मिळाले तर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला घरभाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च,घरगुती खर्च अशा अशख्य समस्याना तोंड द्यावे लागते. आज 15 तारीख होऊन सफाई कंत्राटी कामगारांचा पगार कंत्राटदाराकडून करण्यात आला नाही.
आपणास विनंती आहे कि सदर विषयाची दखल घेऊन कामगारांना महिन्याच्या 1 ते 10 तारखेच्या आता वेतन मिळेल या बाबत योग्य कारवाही करावी.
चालू महिन्याचे वेतन लवकरात लवकर देण्याची सूचना संबंधित विभागाली द्यावी.