
Maharashtra Goverment On Mumbai Redevelopment: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईच्या पुनर्विकासासाठी (Mumbai Redevelopment) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ केली जाणार आहे. 400 चौरस फुटावरून 600 चौरस फुटापर्यंत नोंदणी फी माफ होणार आहे. घराचे बांधकाम क्षेत्र 200 चौरस फूट वाढूनही नोंदणी फी होणार माफ होणार आहे.
महसूल विभागाच्या परिपत्रात म्हटलंय?
प्रति,
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय :- सुचना क्र. २.१ (अ) नुसार जुन्या इमारतीतील भाडेकरूस नवीन इमारतीत जागा देताना करावयाच्या मुल्यांकनाबाबत…
संदर्भ:- आपले जावक क्र. सहसंनर-मु/पु/सुचना क्र.२.१(अ)/६७५/दि.३१.०७.२०२५ रोजीचे पत्र
महोदय,
उपरोक्त विषयावरील संदर्भाधिन पत्रान्वये शासनास पाठविलेल्या प्रस्तावाचे व त्यासोबत पाठविलेल्या परिपत्रकाचे अवलोकन व्हावे. आपल्या संदर्भाधिन पत्रासोबत जोडलेले परिपत्रक निर्गमित करण्यात हरकत नसावी तथापि मार्गदर्शक सुचना क्र. २ (अ) व २ (ब) यामध्ये केवळ क्लस्टर डेव्हलपमेंट करीता बदलाची तरतुद लागु होईल. सदर परिपत्रकामुळे सन २०२५-२६ मधील वार्षिक मुल्यवर तक्त्यामध्ये घट किंवा वाढ होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच या बदलामुळे वार्षिक मुल्यदर तक्त्यामध्ये सदर परिपत्रकामुळे घट/वाढ होत असल्यास ही वाढ/घट दि.०१.०४.२०२६ रोजी प्रसिध्द केले जाणाऱ्या वार्षिक मुल्यदर तक्त्यापुर्वी होणार नाही म्हणजेच या पुर्वी दिलेल्या निर्देशाचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, ही विनंती.
आपला,
विनायक लवटे
अवर सचिन, महाराष्ट्र शासन.
राज्यातील देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
आणखी वाचा