Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या स्थगितीसाठी ISWAI न्यायालयात, नक्की कारण काय?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या स्थगितीसाठी ISWAI न्यायालयात, नक्की कारण काय?
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या स्थगितीसाठी ISWAI न्यायालयात, नक्की कारण काय?


तंत्रज्ञान बदलल्याने सर्वसामन्यांच्या आयुष्यातही मोठ्या प्रमाणात बदल झाले. तंत्रज्ञानाचा चांगला परिणाम इतर सर्वच गोष्टींवर झाला तसाच तो क्रीडा क्षेत्रावरही झाला. मातीतली कुस्ती मॅटवर खेळवण्यात येऊ लागली. त्यामुळे कुस्तीचे स्वरुप बदललं. महाराष्ट्रात कुस्ती खेळणारा, कुस्तीला फॉलो करणारा किती मोठा वर्ग आहे? हे वेगळं सांगण्याची गरज नाही. राज्यात महाराष्ट्र केसरी आणि इतर मानाच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांत कुस्तीलाही राजकारणाचा स्पर्श झाला आहे. त्यामुळे वर्षभरात 2-3 वेळा महाराष्ट्र केसरी आणि इतर मानाच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे या स्पर्धांची मजा काही प्रमाणात कमी झाल्याचं कुस्ती प्रेमींकडून म्हटलं जातं. अशातच आता कुस्तीबाबत पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे.

पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेवर स्थगिती आणावी. तसेच त्या संदर्भात मनाईचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेकडून करण्यात आली आहे.

पुण्यातील वाघोलीत 18 ते 22 मार्च दरम्यान या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेवर स्थिगिती आणण्यासाठी इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेकडून
पुणे जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. संघटनेचे सरचिटणीस गौरव सचदेवा आणि राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन खोपडे यांनी न्यायलयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केलाय. याबाबतची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. अभिषेक येंडे, संजुक्ता डे, राजसाहेब पंडितराव पाटील आणि यश दिंडे या वकीलांमार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर स्थगिती आणि मनाईचे आदेश देण्याच्या मागणीवर आता सोमवारी 16 मार्च रोजी न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडियाचं आवाहन काय?

दरम्यान इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडियाने कुस्तीपटू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींना उद्देशून आवाहन केलं आहे. अफवा तसेच दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडियाकडून करण्यात आलं आहे.

तसेच पत्रकार परिषदेच्या शेवटच्या टप्प्यात कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी संघटना कार्यरत राहील, असा शब्द यावेळेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया संघटना पारंपरिक कुस्ती आणि तिच्या ऐतिहासिक किताबांच्या संरक्षणासाठी कटीबद्ध आहे. तसेच हिंद केसरी, भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद आणि महाराष्ट्र केसरी या प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांच्या किताबांच्या परंपरेचं जतनासाठी कायदेशीर पावलं उचलण्यात आल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेदरम्यान सांगण्यात आलं.

ISWAI बाबत थोडक्यात

ISWAI संघटना 1958 पासून कार्यरत आहे. संघटनेकडून देशभरातील कुस्तीपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. तसेच पारंपरिक भारतीय कुस्तीचा वारसा जपण्याचं काम संघटनेकडून केलं जातं. संघटनेकडून या ऐतिहासिक स्पर्धांच्या किताबांचं नाव आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी ट्रेडमार्क नोंदणीही करण्यात आली आहे. पारंपरिक कुस्तीच्या प्रसारासाठी United World Wrestling संघटनेकडून मान्यता मिळाली आहे. या संस्थेची ISWAI ही भारतातील पारंपरिक कुस्तीचे प्रतिनिधित्व करणारी अधिकृत राष्ट्रीय संघटना आहे, अशी माहिती या वेळेस पदाधिकाऱ्यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *