
<p>Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या राजकीय युतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडलंय. मुंबईत अखेर शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेला सत्तरच्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी असल्याचं समजतंय. सध्या जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाहीय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांच्या फेऱ्यांमध्ये ती चर्चा पुढे जाऊ शकते. मनसेनं याआधीच ज्या प्रभागामध्ये ताकद आहे अशा 125 जागांची यादी तयार केलीय. त्यामुळे युतीमध्ये छोट्या भावाची भूमिका स्वीकारायला राज ठाकरे तयार होणार का, हा प्रश्न आहे.</p>
Source link