
मेळघाटात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का…
उबाठाचे मेळघाट विधानसभा प्रमुख सुनील चौथमल यांचा भाजपमध्ये प्रवेश..
धारनी नगरपंचायत मधून नगराध्यक्षाची तिकीट सुनील चौथमल यांना ?
उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि मेळघाट विधानसभा प्रमुख सुनील चौथमल यांनी अमरावतीत येऊन भाजपात प्रवेश घेतला.. भाजप निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, खासदार अनिल बोंडे, माजीमंत्री प्रवीण पोटे, आमदार केवलराम काळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला..
सुनील चौथमल यांचा भाजपचा दुपट्टा देत भाजपा मध्ये पक्षप्रवेश करून घेण्यात आला. त्यांना भाजपकडून धारणी नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सुद्धा देण्यात आली असल्याची माहिती आहे..
धारनी नगरपंचायत क्षेत्रात सुनील चौथमल यांचे मोठे प्रस्थ आहे, चौथमल कुटुंबीयांचे धारणी नगरपंचायत क्षेत्रात मोठी ताकद आहे. दोन दिवसांपूर्वी चिखलदरा नगरपरिषद मधून अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी यांनी देखील भाजपा मध्ये पक्ष प्रवेश झाला होता, एकूणच अमरावतीमध्ये भाजपमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये इन्कमिंग जोरात सुरु आहे….