
उद्धव ठाकरे बुधवारपासून तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर, सात ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार
उद्धव ठाकरे संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या कार्यालयाला सुद्धा भेट देणार
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला, ऑपरेशन शेंदूर मतदार याद्यातील झालेला घोळ या सगळ्यावर विरोधकांनी सरकारला घेतले असताना याच दरम्यान होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून इंडिया आघाडीची पुढील रणनीती यामध्ये ठरवले जाणार
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली असून उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे
सात ऑगस्टला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी झालेली ऑनलाइन इंडिया आघाडीची बैठक आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकांशिवाय मध्ये कुठलीही बैठक आघाडीची झालेली नाही…