Maharashtra News LIVE : मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगाव मध्ये नोंद

Maharashtra News LIVE : मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगाव मध्ये नोंद
Maharashtra News LIVE : मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगाव मध्ये नोंद


  • 13 Mar 2026 01:28 PM (IST)

    जळगाव – कॉलेजच्या मेसवर अवलंबून विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मोठा दिलासा

    जळगावमध्ये कॉलेजचमधल्या मेसवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मोठा दिलासा मिळाला आहे.  जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानंतर महाविद्यालयातील वस्तीगृहांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामुळे हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकाचा प्रश्न सुटला.  जळगाव जिल्ह्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे शैक्षणिक वस्तीगृहांमधील स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर बनला होता.

  • 13 Mar 2026 01:18 PM (IST)

    नागपुरात जळाऊ लाकडांची वाढली मागणी, निवडला चुलीवर स्वयंपाकाचा मार्ग

    नागपुरात गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने जळाऊ लाकडांची मागणी वाढली आहे.  लाकडाच्या दुकानातून जळाऊ लाकूड नागरिकांकडून खरेदी केलं जात आहे.  नागरिकांनी चुलीवर स्वयंपाक करण्याचा मार्ग निवडला  आहे. आधीच्या तुलनेत जळाऊ लाकडांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती दुकानदारांनी दिली.

  • 13 Mar 2026 01:13 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर – व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक पोळी भाजी केंद्र बंद

    व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक पोळी भाजी केंद्र बंद आहेत.  गॅस संपल्याने स्वयंपाक अर्धवट, भाजी केली मात्र पोळ्या करताना गॅस संपला .  जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना आल्यापावली परतावं लागतं. सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठा करावा अशी मागणी पोळी भाजी केंद्र चालकांनी केली आहे.

  • 13 Mar 2026 12:57 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक पोळी भाजी केंद्र बंद

    व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक पोळी भाजी केंद्र बंद. गॅस संपल्याने स्वयंपाक अर्धवट, भाजी केली मात्र पोळ्या करताना संपला गॅस. जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना परतावं लागतं आल्या पावली. रुचिरा पोळी भाजी केंद्रावर दिवसासाठी 250 ते 300 लोकांना मिळतं जेवण.सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याची पोळी भाजी केंद्र चालकाची मागणी.

  • 13 Mar 2026 12:50 PM (IST)

    मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगाव मध्ये नोंद

    मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगाव मध्ये नोंद. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आला आहे. जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हाच्या वेळी घराच्या बाहेर फिरणार टाळा, आवश्यक काम असेल तर संपूर्ण खबरदारी घेऊनच बाहेर पडा, भरपूर पाणी प्या, प्रशासनाचे आवाहन.

  • 13 Mar 2026 12:37 PM (IST)

    ‘मी बायकोला मारून आलोय’

    ‘मी बायकोला मारून आलोय’ नवऱ्याच्या कबुलीजबाबाने पोलिसही चक्रावले. कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या. नाशिकच्या पोलीस ठाण्यात स्वतःहून पोहोचून पतीची धक्कादायक कबुली. खडकपाडा पोलिसांनी तपास केला असता उंबर्डे परिसरात पत्नीचा मृतदेह आढळला. चारित्र्याच्या संशयावरून विशाल भुतकरकडून पत्नी अर्चनाची गळा आवळून हत्या.

  • 13 Mar 2026 12:23 PM (IST)

    कांदिवलीत गॅस सिलिंडरसाठी लोकांची मोठी गर्दी

    कांदिवलीतील पोईसरनंतर आता चारकोपमध्येही गॅस सिलिंडरसाठी लोकांची मोठी गर्दी आहे. कडक उन्हात लोक गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे आहेत. चारकोप गॅस सिलिंडर एजन्सीचा कर्मचारी म्हणतो की येथे गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत पण लोक घाबरले आहेत.

  • 13 Mar 2026 12:10 PM (IST)

    वाशिष्टी नदीचे पाणी प्रदूषित असल्याचा धक्कादायक अहवाल

    चिपळूण तालुक्यातील वाशिष्टी नदीचे पाणी प्रदूषित असल्याचा धक्कादायक अहवाल. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निष्कर्ष. नॅशनल वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग प्रोग्रॅम अंतर्गत अहवाल प्रसिद्ध. महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये वाशिष्टी नदीचा समावेश. नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत गंभीर बिघाड झाल्याचे निरीक्षण. औद्योगिक सांडपाणी आणि शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषण वाढल्याची शक्यता.

  • 13 Mar 2026 11:55 AM (IST)

    बीडमध्ये घरपोच गॅस सेवा बंद तर गॅस बुकिंगचे नंबरही बंद ; बीडमध्ये ग्राहकांची एजन्सीबाहेर गर्दी.

    बीडमध्ये गॅस एजन्सीच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता थेट बीड जिल्ह्यातील नागरिकांवर होत असल्याचे दिसू लागले आहे. प्रशासन घरगुती गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करत असताना वास्तव मात्र वेगळंच दिसत आहे. गॅस एजन्सीकडून घरपोच डिलिव्हरी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे तर बुकिंगसाठी दिलेले फोन नंबरही सतत बंद येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांना एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.

  • 13 Mar 2026 11:40 AM (IST)

    मुंबईतील कांदिवली पोईसर भागात गॅस सिलिंडरसाठी लोकांची मोठी गर्दी

    मुंबईतील कांदिवली पोईसर भागात गॅस सिलिंडरसाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. पोईसर हा एक मोठा झोपडपट्टी भाग आहे आणि येथे गॅस पाइपलाइन नसल्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना गॅस सिलिंडर न मिळाल्याने सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. लोक गॅस सिलिंडर घेऊन रांगेत उभे आहेत, गॅस सिलिंडर गाडी येण्याची वाट पाहत आहेत. आज लोक पहाटे ५ वाजल्यापासून येथे रांगेत उभे आहेत. आजही लोकांना गॅस सिलिंडर मिळतील की नाही याची कल्पना नाही. मुले, वृद्ध आणि महिलांसह लोक गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे आहेत.

  • 13 Mar 2026 11:30 AM (IST)

    अमरावती मध्ये गॅस तुटवडया विरोधात काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन…

    अमरावती मध्ये गॅस तुटवडया विरोधात काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं.  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चूल पेटवून काँग्रेसने आंदोलन सुरू केले. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सिलेंडर साठी नागरिकांना  रांगा लावाव्या लागत आहे.

  • 13 Mar 2026 11:20 AM (IST)

    गॅस टंचाईमुळे इंडक्शन (इलेक्ट्रिक) शेगडीची मोठ्या प्रमाणात विक्री

    इराण, इजराइल व अमेरिका यांच्यातील युद्धामुळे गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून अनेक नागरिकांना बुकिंग केल्यानंतरही घरगुती गॅस मिळत नाही. त्यामुळे पर्याय म्हणून अनेकांनी आता इंडक्शन शेगडीकडे मोर्चा वळविला आहे. सध्या बाजारपेठेत इंडक्शन शेगडीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून नियमित विक्रीच्या तुलनेत दुपटीने विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. वाढत्या मागणीमुळे काही ठिकाणी दर वाढले असून पुढील दोन दिवसांत आणखी दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होलसेल डीलरकडून किरकोळ विक्रेत्यांना मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने ग्राहकांना इंडक्शन शेगडी मिळवण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस मिळत नसल्यामुळे नाईलाजाने इंडक्शन शेगडी घेत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी व्यक्त केल्या आहेत.

  • 13 Mar 2026 11:08 AM (IST)

    जालन्यातील बदनापूर येथील गॅस एजन्सीच्या बाहेर सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

    आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचा परिणाम आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही गॅस टंचाईचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे, सिलिंडर मिळणार नाही या भीतीपोटी ग्रामीण भागातील नागरिक एजन्सीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. जालन्यातील बदनापूर येथील गॅस एजन्सीच्या बाहेर आज सकाळपासूनच एजन्सी उघडण्यापूर्वीच नागरिकांनी तोबा गर्दी केलेली आहे. बुकिंग करूनही सिलेंडर मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांची बाचाबाची होऊन गोंधळ देखील उडत आहे.

  • 13 Mar 2026 10:56 AM (IST)

    घरगुती गॅसचा हॉटेलमध्ये अवैध वापर, २८ सिलेंडर जप्त

    बीड जिल्ह्यात व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर करणाऱ्या हॉटेल चालकांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाभरात नियुक्त केलेल्या १९ विशेष पथकांनी तब्बल २०३ ठिकाणी छापेमारी करत २८ घरगुती सिलेंडर जप्त केले आहेत. या कारवाई दरम्यान तीन हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. इतरांवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत असतानाही, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

  • 13 Mar 2026 10:46 AM (IST)

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील CNG पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

    आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील इंधन पुरवठ्यावर जाणवू लागला आहे. महामार्गावरील वसई हद्दीतील सीएनजी (CNG) पंपांना गॅसचा मोठा तुटवडा भासत असून, पुरवठ्यात कपात झाल्याने वाहनचालकांना तासंतास रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. विशेषतः सर्वाधिक रहदारी असलेल्या ब्रम्हासेल पंपावर दररोज येणाऱ्या ५ ते ६ गाड्यांऐवजी आता केवळ ३ ते ४ गाड्या येत असल्याने वाहनांची मोठी कोंडी होत आहे.

  • 13 Mar 2026 10:36 AM (IST)

    जालन्यातील अंबडमध्ये पुरवठा विभागाची धडक कारवाई, 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त

    जालन्यातील अंबड तालुक्यात पुरवठा विभागाने अवैध गॅस वापराविरोधात धडक मोहीम राबवत ९ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक किरणकुमार खांडेभराड यांच्या पथकाने शहरातील हॉटेल,रेस्टॉरंट व व्यावसायिक आस्थापनांची अचानक तपासणी केली. यावेळी व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडर वापर होत असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत ९ सिलिंडर जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. दरम्यान, पथकाने तालुक्यातील ३ पेट्रोल पंपांचीही तपासणी करून साठा, विक्री नोंदी आणि इंधन वितरणाबाबत सूचना दिल्या. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

  • 13 Mar 2026 10:26 AM (IST)

    नाशिकचे प्रसिद्ध सायंतारा हॉटेल बंद; साबुदाणा वड्यांच्या प्रेमींची मोठी गैरसोय

    नाशिकमधील साबुदाणा वड्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेले सायंतारा हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे. शहरात गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल चालवणे कठीण झाले असून, हॉटेलच्या बाहेर तसा फलकही लावण्यात आला आहे. मात्र, उपवास असलेल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी केवळ उद्या आणि परवा हे हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. प्रसिद्ध खाद्यपेय केंद्रांनाही गॅस अभावी कुलूप लावावे लागत असल्याने नाशिककर खवय्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

  • 13 Mar 2026 10:17 AM (IST)

    सोलापुरात हॉटेल व्यावसायिकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ, सरपणाचे दर वाढले

    सोलापूर शहरात सध्या कमर्शियल गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत. गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल चालकांनी आता पारंपरिक चुलींचा आधार घेतला आहे. यामुळे लाकडाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने लाकडाच्या किमतीतही मोठी वाढ झाली असून, एका मणामागे तब्बल १०० रुपयांची दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सणासुदीच्या काळात हा तुटवडा व्यवसायावर परिणाम करत असल्याने, सरकारने तातडीने गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सोलापुरातील हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.

  • 13 Mar 2026 10:06 AM (IST)

    अमरावती जिल्हा परिषदेचा 22 कंत्राटदारांना दणका, कामात दिरंगाई केल्यामुळे ठोठावला दंड.

    अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या २२ कंत्राटदारांना मोठा दणका दिला आहे. विहित मुदतीत कामे न केल्यामुळे या कंत्राटदारांना प्रति दिवस १०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही दंडाची रक्कम त्यांच्या देयकातून (बिल) वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रलंबित कामांना काही अटींसह मुदतवाढ देण्यात आली असली तरी, सर्व कामे गुणवत्तापूर्ण असणे अनिवार्य असल्याचे महापात्रा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, कामात हलगर्जीपणा झाल्यास केवळ कंत्राटदारच नव्हे, तर संबंधित विभागप्रमुखांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.

  • 13 Mar 2026 09:50 AM (IST)

    जालन्यात लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात

    मंठा येथे एका पोलीस निरीक्षकासह पोलीस अंमलदाराला ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पोलिस निरीक्षक मनोज कुमार राठोड आणि पोलीस अंमलदार रवी जाधव यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. वाळू वाहतुकीच्या हायवावर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता आणि सुरळीत चालवण्यासाठी केली होती लाचेची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

  • 13 Mar 2026 09:40 AM (IST)

    अमरावती ठरले देशातील सर्वात उष्ण शहर

    काल अमरावती ठरले देशातील सर्वात उष्ण शहर; काल अमरावती 42.2 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद. नागरिक सकाळी नऊ वाजताच्या आधी घराबाहेर पडत असतानाही नाही तोंडाला टॉवेल आणि स्कार्फ बांधूनच पडताय बाहेर. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील तापमानाच्या तुलनेत कालचे हे तापमान जास्त असल्याची माहिती. मार्च महिन्यातच विदर्भात उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे..उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी होत असल्याचे चित्र आहे.

  • 13 Mar 2026 09:30 AM (IST)

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेला दिलासा

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम माणिक चाटे याला जिल्हा न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. दिवंगत भाऊ श्रीराम चाटे यांच्या बाराव्या दिवसाच्या धार्मिक विधीसाठी आज 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय दिला. आरोपीच्या वकिलांनी सर्व अटींचे पालन करण्याची तसेच पोलिस बंदोबस्ताचा खर्च भरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आरोपीवर गंभीर गुन्हे असल्याने त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची मर्यादित परवानगी मंजूर केली आहे.

  • 13 Mar 2026 09:20 AM (IST)

    नाशिकमध्ये लाचखोर जीएसटी अधिकाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

    जीएसटी विभागाचे कर उपआयुक्त सोमनाथ पागे राज्यकर सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोदे यांचाही जामीन अर्ज नामंजूर. खाजगी पंटर अमित जाधव याचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. लाचखोर अधिकाऱ्यांना मोठा झटका. जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. २० लाख रुपयांची लाच घेताना मुंबईच्या एसीबीने केली होती कारवाई. कारवाई टाळण्यासाठी फिर्यादीकडून मागितली होती 1 कोटी 25 लाख रुपयांची लाच. पहिला 20 लाखांचा हप्ता घेताना एसीबीने जीएसटी अधिकाऱ्यांवर केली होती कारवाई

  • 13 Mar 2026 09:06 AM (IST)

    नागपुरात आजही गॅस सिलेंडर साठी लागली नागरिकांची मोठी लाईन

    गॅस एजन्सी उघडण्याच्या आधी पासूनच नागरिकांची लावली लंबी लाईन. मोठ्या प्रमाणात लंबी लाईन. प्रशासनाने गॅस चा तुटवडा नसल्याचं वारंवार सांगून सुद्धा नागरिकांच्या लागत आहे रांगा. सिलेंडर ची उपलब्धता आहे मात्र ऑन लाईन नंबर लावण्यात अडचणी येत आहे ओटीपी शिवाय घरपोच सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे सिलेंडर च्या चिंतेत नागरिक स्वतःच एजन्सी मध्ये सिलेंडर घेण्यासाठी पोहचत आहे

  • 13 Mar 2026 09:00 AM (IST)

    विधानसभेत आज अर्थसंकल्पीय मागण्यांवरती चर्चा

    विधानसभेत आज अर्थसंकल्पीय मागण्यांवरती चर्चा होणार आहे. या चर्चा पूर्ण झाल्यानंतर सभागृहात मान्य होतील. विरोधकांचा 293 च्या प्रस्तावावरती काल चर्चा होऊ शकली नाही,त्यामुळे आज यावरती चर्चा होणार आहे. या चर्चदरम्यान विरोधक अजित पवारांच्या अपघाती निधना संदर्भात अनेक मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता आहे.

  • 13 Mar 2026 08:50 AM (IST)

    नाशिकमध्ये कोळशावरचा चहा

    नाशिकमध्ये गॅस नसल्याने चहाच्या टापर्‍यांवर आता कोळसा वापरला जातोय नाशिकच्या अनेक टपऱ्यांवर आता कोळसा चहा विक्री होत आहे. गॅस तुटवड्यावर आता चहा विक्रेत्यांनी नवीन फंडा शोधून काढला आहे. गॅस पेक्षा देखील कोळसा स्वस्त आहे. तसेच छोट्या जागेत चूल होत नसल्याने चुलीला देखील कोळशाचा पर्याय मिळाला आहे.

  • 13 Mar 2026 08:40 AM (IST)

    चंद्रपूर शहराच्या काही भागात पाणीपुरवठा खंडित

    पुढील दोन ते तीन दिवस चंद्रपूर शहरातील काही भागांत पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत राहणार आहे. या कालावधीत नगीना बाग, चोर खिडकी, चपराशी कॉलनी, दादमहल वॉर्ड, भानापेठ वॉर्ड, अंचलेश्वर वॉर्ड, महाकाली वॉर्ड, भिवापूर वॉर्ड, बैलबाजार, रामाळा तलाव रोड, बगड खिडकी, जलनगर वॉर्ड, जटपुरा वॉर्ड, हॉस्पिटल वॉर्ड, बाजारवॉर्ड, एकोरी मंदिर वॉर्ड, ख्रिश्चन कॉलनी, पंचशील चौक, रामनगर, बोकारे प्लॉट, राष्ट्रवादी नगर, आंबेडकर सभागृह नगर, ठक्कर कॉलनी, सिस्टर कॉलनी तसेच जगन्नाथ बाबानगर या परिसरातील पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • 13 Mar 2026 08:32 AM (IST)

    जादा पैसे वसूल करणाऱ्या चार रुग्णालयांना दंड

    जनआरोग्य योजनेतील रुग्णांकडून जादा पैसे वसूल करणाऱ्या यवतमाळमधील चार रुग्णालयांना दंड ठोठावण्यात आला.यवतमाळ जिल्ह्यात जन आरोग्य पथकाने ही कारवाई केली आहे. यवतमाळ मधील नामवंत क्रीटीकेयर हॉस्पिटल 1 लाख 1 हजार 700 अगस्थ्य ऑर्थपेडिक हॉस्पिटल 75 हजार, चिंतामणी हॉस्पिटल 3 लाख 40 हजार , महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 18 हजार असा दंड जिल्हाधिकारी यांच्या कडे सुनावणी होऊन ठोठावला

  • 13 Mar 2026 08:22 AM (IST)

    विदर्भात अवकाळीचा सांगावा

    विदर्भात सध्या उष्णतेची लाट मात्र उद्यापासून अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अमरावती काल राज्यात सर्वाधिक उष्ण शहर ठरले, गुरुवारी तब्बल 42.2 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे. ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे. मात्र उद्यापासून विदर्भात तापमानात बदल होऊन अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे

  • 13 Mar 2026 08:12 AM (IST)

    रमाई घरकुल योजनेत मोठा अपहार-इम्तियाज जलील

    रमाई घरकुल योजनेत कसा भ्रष्टाचार केला जात आहे असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. कशा प्रकारे बोगस कागदपत्रे तयार केली जातात हे त्यांनी दाखवले. ही कागदपत्रे आपल्याला अज्ञात व्यक्तीने पाठवले असल्याचे जलील यांनी सांगितले. चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्पन्न प्रमाणपत्र तहसील मधून काढले जातात. एकनाथ शिंदे यांचे बोगस रहिवाशी प्रमाणपत्र ही इम्तियाज जलील यांनी दाखवले

  • 13 Mar 2026 08:05 AM (IST)

    एलपीजी सिलेंडर पुरवठा सुरळीत करा, मनसे आक्रमक

    मुंबईतील मुंबादेवी विधानसभा क्षेत्रात गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.मनसेच्या वतीने आज मुंबादेवी विभागातील विविध गॅस एजन्सींना निवेदन देण्यात आले. सध्या भारताबाहेर सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा आधार घेत काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा दाखवून काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी पक्षाकडे येत असल्याचे मनसेने सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गॅसचा पुरवठा वेळेत आणि नियमानुसार करावा, अशी मागणी करण्यात आली.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *